रेमडेसिव्हर इंजेक्शन चोरी प्रकरणातील आरोपीला राज्यात पहिली शिक्षा नागपुरात

रेमडेसिव्हर इंजेक्शन चोरी प्रकरणातील आरोपीला राज्यात पहिली शिक्षा नागपुरात
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: कोरोना संसर्ग काळात रेमडेसिव्हर इंजेक्शन चोरी प्रकरणातील राज्यातील पहिली शिक्षा नागपूरात ठोठावण्यात आली आहे. रेमडेसिव्हर इंजेक्शन चा काळाबाजार करणाऱ्या एका तरुणाला विशेष न्यायालयाने तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. महेंद्र रतनलाल रंगारी (वय २८) असे शिक्षा झालेल्‍या आरोपीचे नाव आहे.

अधिक वाचा :

आरोपी रंगारी हा दिघोरी नाका, हुडकेश्वर येथील रहिवासी असून तो क्रीडा चौकातील कोव्हिड सेंटरमध्ये कार्यरत होता. आरोपीने १७ एप्रिल २०२१ रोजी या सेंटरमध्ये उपचाराकरिता भरती असणाऱ्या रुग्णाकडील रेमडेसिव्हर इंजेक्शनची चोरी केली होती.

'सीसीटीव्ही' फुटेजमध्ये तो इंजेक्शन चोरी करताना दिसून आला.तसेच, चोरी गेलेले इंजेक्शन त्याच्या ताब्यात मिळाले. त्यामुळे सेंटरचे व्यवस्थापकांनी रंगारीविरुद्ध इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.

अधिक वाचा 

रेमडेसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार

महेंद्र याच्‍यावर रेमडेसिव्हर इंजेक्शनच्या काळाबाजाराचा आरोप लावण्यात आला होता. हुडकेश्वर पोलिसांनी १७ एप्रिल २०२१ रोजी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव अती प्रभावी आणि उच्चांकी पातळीवर होता.

त्या काळात रेमडेसिव्हर  इंजेक्शन हे अनेकांसाठी जीवनदान ठरत होते. त्यामुळे हे इंजेक्शन जीवनावश्यक झाले होते.

अधिक वाचा 

अनेक कोरोनाबाधितांना रेमडेसिव्हिरची गरज भासत होती. अशा काळात शहरात काहींनी या इंजेक्शनचा काळाबाजार केला. अशा असामाजिक तत्त्वांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली.

उच्च न्यायालयात करोनाबाबत दाखल जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यानही हा मुद्दा चर्चेला आला होता.

यावर न्यायालयाने काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

पुढे झालेल्या सुनावणीदरम्यान या प्रकरणांचे खटले फास्ट ट्रॅक न्यायालयात निकाली काढावेत असेही आदेश न्यायालयाने दिले होते.

इंजेक्शन चोरी प्रकरणी राज्यातीलही पहिलीच शिक्षा

ॲड. ज्योती वजानी यांनी या प्रकरणांमध्ये विशेष सरकारी वकील नियुक्त करण्यात आले. या प्रकरणात वजानी यांनी सरकारची बाजू मांडली ॲड. लीना गजभिये यांनी त्यांना सहकार्य केले.

दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यावर आरोपीला दोषी ठरवित तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

रेमडेसिव्हर इंजेक्शन चोरी प्रकरणातील आरोपीला राज्यात ही पहिलीच शिक्षा आहे.

हेही वाचलं का?

पाहा व्‍हिडिओ :कोल्हापूर शहर महापुराच्या विळख्यात

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news