इसिस-के संघटनेचा खात्‍मा करण्‍यासाठी अमेरिकेने केला हा ‘प्लॉन’

इसिस-के संघटनेचा खात्‍मा करण्‍यासाठी अमेरिकेने केला हा ‘प्लॉन’

वॉशिंग्‍टन; पुढारी ऑनलाईन: अफगाणिस्‍तानवर तालिबानने कब्‍जा केल्‍यानंतर इसिस-के या दहशतवादी संघटनेने देशात धुमाकूळ घालण्‍यास सुरुवात केली आहे. काबूल विमानतळावर आत्‍मघाती बॉम्‍बस्‍फोट घडवत इसिस-के या दहशतवादी संघटनेने तालिबानला आव्‍हान दिले हाेते. आता तालिबानसह अमेरिकेसमोरही या संघटनेचे मोठे आव्‍हान आहे. या संघटनेचा खात्‍मा करण्‍यासाठी अमेरिकेने प्‍लॉन तयार केला आहे.

इस्‍लामिक स्‍टेट ऑफ इराक अँड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेची सहकारी संघटना म्‍हणून इसिस-केची ओळख आहे. 'के' हे अक्षर अफगाणिस्‍तानमधील खुरासान प्रांतासाठी वापरण्‍यात येते. तालिबानमधील काही नाराज गटांनी इसिस-केमध्‍ये प्रवेश केला आहे. आता या संघटेनेने तालिबान्‍यासह अमेरिकेसमोरही आव्‍हान आहे.

हा आहे 'प्लॉन'…

अमेरिकेच्‍या सैनिकांनी अफगाणिस्‍तान सोडले आहे. संपूर्ण देशावर कब्‍जा मिळविण्‍यासाठी तालिबान्‍यांची धडपड सुरु आहे. मात्र दुसरीकडे अमेरिकेचे राष्‍ट्रध्‍यक्ष बायडेन यांनी इसिस-केचा खात्‍मा करण्‍यासाठी नियोजन करत आहेत. इसिस-केचे तळ असणार्‍या ठिकाणी हवाई हल्‍ला करण्‍याचा अमेरिकेचा प्‍लॉन आहे. मात्र यासाठी तालिबान्‍यांचीच मदत घ्‍यावी लागणार आहे. अफगाणिस्‍तानमधील दहशतवादाचे उच्‍चाटन करण्‍यासाठी तालिबानची मदत घेण्‍याचा निर्णय बायडेन यांनी घेतल्‍याचे सूत्रांनी म्‍हटले आहे.

अमेरिकेच्‍या संरक्षण मंत्रालयातील एका वरिष्‍ठ अधिकार्‍याने सांगितले की, तालिबान आणि इसिस-के हे एकमेकांविरोधात आहेत.  मागील २० वर्ष अफगाणिस्‍तानमध्‍ये युद्‍धकैदी म्‍हणून कारागृहात असलेल्‍या तालिबान्‍यांची सुटका करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. यामध्‍ये दोन हजारांहून अधिक इसिस-के दहशतवाद्‍यांचाही समावेश आहे. हे दहशतवादी अफगाणिस्‍तानमध्‍ये धुमाकूळ घालतील, असा संशय तालिबानी व्‍यक्‍त करती आहेत,

इसिस-केविरोधात तालिबानचे सहकार्य?

तालिबानने अमेरिकेतील नागरिकांना काबूल विमानतळावर पोहचण्‍यासाठी मदत केली होती. त्‍यामुळे मागील काही दिवसांमध्‍ये अमेरिका आणि तालिबानमधील संबंध हे व्‍यावसायिक झाले आहेत.

तालिबान ही एक क्रूर संघटना आहे. भविष्‍यात यामध्‍ये काेणता बदल होईल का, हे सांगत येत नाही.

तालिबानला सहकार्य करण्‍याबाबत आताच भाष्‍य करता येणार नाही.

मात्र इसिस-केचा खात्‍मा करण्‍यासाठी अमेरिका आणि तालिबान यांनी एकत्र येण्‍याची गरज आहे, असे अमेरिकेच्‍या लष्‍करप्रमुख मार्क मिल्‍ले यांनी म्‍हटले आहे.

हेही वाचलं का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news