इंडियन आयडल मराठी : लता दीदींसाठी स्वरांजली

इंडियन आयडल मराठी : लता दीदींसाठी स्वरांजली
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

सोनी मराठी वाहिनीवरील फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. यांची निर्मिती असलेला 'इंडियन आयडल मराठी' हा कार्यक्रम आता रंगतदार होऊ लागला आहे. महाराष्ट्रातील गायकांसाठी सुरांच्या मंचावर म्हणजेच इंडियन आयडल मराठी या कार्यक्रमाच्या मंचावर लतात दीदींना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. या कार्यक्रमात येत्या १४ फेब्रुवारीला लतादीदींना स्वरांजली वाहण्यात येणार आहे.

संगीतसृष्टीला पडलेलं सुरेल स्वप्न म्हणजे लता मंगेशकर. दीदींनी आपल्या वडिलांकडून गाण्याचं प्रशिक्षण घेऊन अगदी कमी वयात गाण्याची सुरुवात केली. गेली अनेक दशकं लता मंगेशकर या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. नायिकांच्या तब्बल चार पिढ्यांना लता दीदींनी आवाज दिला आहे. त्यांचा इहलोकीचा प्रवास जरी संपला असला, तरी त्या त्यांच्या गाण्याच्या रूपाने येणारी अनेक दशकं जिवंत असणार आहेत.

मंचावर स्पर्धक आणि परीक्षक अजय-अतुल यांनी भारतरत्न लता मंगेशकर यांना स्वरांजली वाहिली. या वेळी गीतकार-कवी गुरू ठाकूर आणि सौमित्र हेसुद्धा उपस्थित होते. हा खास भाग प्रेक्षकांना १४ फेब्रुवारीला पाहायला मिळणार आहे. हा २ तासांचा विशेष भाग असणार आहे.

पाहा, १४ फेब्रुवारी, रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news