

पुढारी ऑनलाईन : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. 'पुष्पा' हा चित्रपटातील अॅक्शनसोबत डायलॉग ही सध्या चर्चेत आले आहेत. याच दरम्यान देवमाणूस (devmanus ) मालिकेतील अजितकुमार देव यांच्यावरील मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' या चित्रपट अभिनय, गाण्यासोबत डॉयलॉगने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. या चित्रपटातील 'पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या फायर है में…' हा अल्लू अर्जुनचा डॉयलॉग खूपच फेमस झाला. सध्या या डॉयलॉगवर वेगवेगळे मिम्स बनवण्यात येत आहे. याच दरम्यान छोट्या पडद्यावरील देवमाणूस ( devmanus ) मालिकेतील अजितकुमार देव यांच्यावर देखील मिम्स बनवले गेले आहेत. हे मिम्स सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.
पुष्पाच्या अंदाजमधील डायलॉगवर अजितकुमार असा म्हणतो की, 'देवमाणूस नाम सूनके भगवान समजे क्या? भगवान नाही दानव है में'. या मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेक चाहत्यांनी कॉमेंन्टस करत आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
याच दरम्यान देवमाणूसची मुख्य भूमिका साकारणार अभिनेता किरण गायकवाड याने देखील या मिम्स सोशल मीडियावर शेअर केला आहे. या मिम्सला चाहत्यांसोबत मराठी कलाकारांनी भरभरून प्रेम केलं आहे.
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबतच फहाद फासिलने देखील 'पुष्पा' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने एसएस राजामौली याच्या 'बाहुबली' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. हिंदींत 'पुष्पा' या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केल्याची माहिती रमेश बाला यांनी ट्वीट करत दिली आहे.
हेही वाचलंत का?