

पुढारी ऑनलाईन
अभिनेत्री काजोलने तिच्या आगामी 'सलाम वेंकी' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. सोशल मीडियातून काजोलने ही माहिती दिली. काजोलने यासोबतच दिग्दर्शक रेवती आणि चित्रपटाच्या इतर टीमसोबत एक फोटोही शेअर केला आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात एका आईचा संघर्ष दाखवला आहे. या चित्रपटाचे नाव पूर्वी 'द लास्ट हुर्रे'असे ठेवण्यात आले होते.