गंगुबाई काठियावाडी : चित्रपटातील नेहरूंचे दृश्य वगळले | पुढारी

गंगुबाई काठियावाडी : चित्रपटातील नेहरूंचे दृश्य वगळले

पुढारी ऑनलाईन

आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेल्या ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाची सध्या जोरदार हवा झाली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरलाही मोठा प्रतिसाद लाभला. आता या चित्रपटाबाबत आणखी एक बाब समोर आली आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे एक द‍ृश्य या चित्रपटातून वगळण्यात आल्याचे कळते. सूत्रांच्या माहितीनुसार नेहरूंच्या जीवनातील एक घटना दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटात दाखवली होती.

मुंबईतील कामाठीपुरा या वेश्यावस्तीतील कोठेवाली गंगुबाई काठियावाडी यांनी कामाठीपुर्‍यातील गुंडांचा बंदोबस्त करा, अशी मागणी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे केली होती. तेव्हा नेहरूंनी गंगुबाई यांना भेटीसाठी वेळ दिली. ही भेट भन्साळींनी त्यांच्या स्टाईलने चित्रित केली होती.

या भेटीनंतर नेहरूंनी गंगुबाईला गुलाबाचे फूल देताना दाखवले गेले होते. पण, या द‍ृश्यावर सेन्सॉर बोर्डाने कात्री चालवली. त्यामुळे हे द‍ृश्य चित्रपटातून वगळले गेले आहे. हा चित्रपट 25 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत असून तत्पूर्वी 16 फेब्रुवारी रोजी या चित्रपटाचा प्रीमियर बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार आहे.

Back to top button