‘वलीमाई’मध्ये अ‍ॅक्शनचा डोस | पुढारी

‘वलीमाई’मध्ये अ‍ॅक्शनचा डोस

पुढारी ऑनलाईन

तमीळ सुपरस्टार थला अजित याच्या एका चित्रपटाला नेटफ्लिक्सने 300 कोटींची ऑफर दिली होती; पण अजितने आपला चित्रपट ओटीटीवर रीलिज करण्यास नकार दिला. कोरोनामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन लांबले होते. त्याच ‘वलीमाई’ या चित्रपटाचा ट्रेलर शुक्रवारी अभिनेता अजय देवगणच्या हस्ते लाँच करण्यात आला. ट्रेलरवरून दिसते की, चित्रपट अ‍ॅक्शनपॅक्ड आहे. तसेच ‘फास्ट अँड फ्युरियस’प्रमाणे गँगने मोटारसायकलचा वापर करून केलेली चोरी यात दिसते. चित्रपटात अजितसोबत अभिनेत्री हुमा कुरेशीदेखील आहे.

Back to top button