अकरावी सीईटी परीक्षा रद्द; हायकोर्टाने दिले आदेश

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

मुंबई, पुढारी ऑनलाईन : इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी प्रस्तावित सीईटी  (अकरावी सीईटी )उच्च न्ययालयाकडून रद्द करण्यात आली. अकरावी सीईटी  न घेता इयत्ता दहवीच्या गुणांच्या आधारावर मुलांना अकरावीसाठी प्रवेश द्या, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

कोरोनामुळे राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे अंतर्गत गुणांवर आधारित मूल्यांकन करून निकाल लावण्यात आला होता.

त्यामुळे ११ वी प्रवेशासाठी सीईटी अनिवार्य करण्यात आली होती.

‍सीईटीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी राज्य मंडळाने २ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. प्रवेश ११ वी प्रक्रिया कधी सुरु होणार?,

याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते.

सीईटी रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यासही न्यायालयाने नकार दिल्याने हा प्रश्न निकाली निघाला आहे.

हा निर्णय म्हणजे एक प्रकारे राज्य सरकारला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

सहा आठवड्यात प्रवेश प्रक्रिया करा

उच्च न्यायालयाने ११ वी प्रवेश प्रकिया सहा आठवड्यात पूर्ण करण्याचे आदेशही दिले आहेत.

राज्य मंडळाने दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर केली होती.

त्यामुळे मूल्यमापन आणि गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

त्यामुळे राज्य सरकारने अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याचे जाहीर केले होते.

मात्र, १० वी परीक्षा उतीर्ण झाल्यानंतर आता परीक्षा का असा सवालही उपस्थित झाला होता. सीईटीसाठी ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार होती व १९ जुलैपासून सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार होती.

करोनाच्या काळात प्रत्यक्ष परीक्षा घेणे मुलांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. त्यामुळेच न्यायालयाला याप्रकरणी हस्तक्षेप करावा लागला, असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

या परीक्षेतल्या गुणांच्या आधारावरच विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाणार होता. जे विद्यार्थी ही परीक्षा देतील, त्यांना अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य देण्यात येणर होते.

त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर अन्य विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल आणि जे विद्यार्थी ही सीईटी देणार नाहीत, त्यांचे मूल्यमापन दहावीच्या गुणांच्या आधारावर केले जाईल, असे सांगण्यात आले होते.

११ लाख अर्ज

राज्य मंडळातर्फे होणाऱ्या अकरावीच्या सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई),

काउन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (सीआयएससीई) आदी मंडळांच्या ३६ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे,

तर एकूण १० लाख, ९८ हजार ३१८ विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरलेले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news