शेवंता हिचं पुनरागमन चुकविणार प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका | पुढारी

शेवंता हिचं पुनरागमन चुकविणार प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका

मुंबई; पुढारी ऑनलाईन : शेवंता हिचं पुनरागमन प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकविणार आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेने प्रेक्षकांचं अफाट प्रेम मिळवलं. अगदी पहिल्या पर्वापासूनच लोकप्रियतेचे शिखर गाठले.

अधिक वाचा –

लॅाकडाऊनमुळं शूट बंद असल्यानं ‘रात्रीस खेळ चाले ३’ ही लोकप्रिय मालिका प्रसारित होत नव्हती. पण, लवकरच शूट सुरू होऊन या महिन्यात ही मालिका पुन्हा प्रेक्षकांसाठी सज्ज होणार आहे.

अधिक वाचा – 

असे संकेत मालिकेचे लेखक प्रल्हाद कुडतरकर यांनी दिले होते.

प्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपली आहे. कारण १६ ऑगस्टपासून रात्री ११ वाजता पुन्हा एकदा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

अधिक वाचा- 

या मालिकेतील सर्व कलाकार प्रेक्षकांचे अत्यंत आवडते आहेत. त्यातील एक व्यक्तिरेखा जिची मालिकेत प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत ती म्हणजे अपुर्वा नेमळेकर.

शेवंता- अपुर्वा नेमळेकर
शेवंता- अपुर्वा नेमळेकर

रात्रीस खेळ चाले ३ मालिकेचा प्रोमो रिलीज

नुकतंच रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला.

त्यात सगळ्यांच्या काळजाचा ठाव घेणारी अपुर्वा प्रेक्षकांना दिसली. पण, यावेळी तिला पाहून फक्त काळजाचा ठोका चुकणार नाही तर थांबेल कायमचा अशी चेतावणी देणाऱ्या प्रोमोची चर्चा आता सर्वत्र होतेय.

प्रोमोमध्ये तिच्या अदा आणि त्याचवेळी तिचं चित्तथरारक रूप पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. त्यामुळे प्रेक्षक आता आतुरतेने वाट पाहत आहेत १६ ऑगस्टची.

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने शेवंताची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. पण, आता मात्र काळजाचा ठोका चुकवायला नव्हे. तर थेट जीवच घ्यायला येतेय असं सांगितलं. तिनं आपण परतणार असल्याची बातमी दिली आहे. लालबुंद रंगाची नऊवारी साडी, तंग चोळी आणि तिचं सौंदर्य पुन्हा पाहायला मिळणार का? शेवंता नेमकी कोणावर सूड उगवणार, आता याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

हे देखील वाचा – 

पाहा व्हिडिओ – 

 

 

Back to top button