‘X’ युजर्संना आता पोस्ट लाईक्स, रिपोस्टसाठी मोजावे लागणार पैसे

Elon Musk
Elon Musk

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (पूर्वाचे ट्विटर) नवीन सबस्क्रिप्शन मॉडेल आणत आहे. नवीन सबस्क्रिप्शन मॉडेलला 'नॉट अ बॉट' असे नाव देण्यात आले आहे. या नव्या सबस्क्रिप्शन मॉडेलनुसार  इतरांच्या अकाउंटवर केलेल्या पोस्ट लाइक किंवा पोस्ट करण्यासाठी युजर्संना शुल्क आकाराव लागणार आहे. ('X')

ट्विटरची (Twitter) मालकी हक्क मिळाल्यापासून ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क नवनवीन फिचर्स आणतं आहेत. (Elon Musk) लॉन  मस्क हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. ट्विटरवर अनेक प्रयोग करत असतात.  नुकतंच  एलॉन मस्क यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नाव Twitter वरून X असे बदलले. असे बरेच निर्णय त्यांनी घेतले आहेत. आता नवीन सबस्क्रिप्शन मॉडेलबाबत निर्णय घेवू शकतात. या अंतर्गत मूलभूत सुविधांसाठी वार्षिक एक डॉलर शुल्क आकारण्यात येणार आहे.

'नॉट अ बॉट' असे नाव देण्यात आले

नवीन सबस्क्रिप्शन मॉडेलला 'नॉट अ बॉट' असे नाव देण्यात आले आहे, ज्यामध्ये इतरांच्या खात्यांवर केलेल्या पोस्ट लाइक किंवा पोस्ट करण्यासाठी युजर्सना शुल्क आकारण्याची तरतूद असेल. लॉन मस्कसाठी बॉट्स हा वादग्रस्त मुद्दा आहे. हे नवीन सबस्क्रिप्शन मॉडेल सादर करण्याचा उद्देश बॉट्स आणि स्पॅमर्सचा सामना करणे हा आहे.

सदस्यता शुल्क किती?

सदस्यता शुल्क प्रत्येक देशाच्या विनिमय दराच्या आधारे ठरवले जाईल. नवीन सबस्क्रिप्शन मॉडेल लागू झाल्यानंतर, भारतातील यूजर्संना सबस्क्रिप्शन फी म्हणून 83.23 रुपये द्यावे लागतील. याशिवाय चीनला 7.30 युआन, जपानला 149.68 येन द्यावे लागणार आहेत. रशिया X ने सांगितले की, नवीन मॉडेल प्रथम न्यूझीलंड आणि फिलिपाइन्समध्ये लागू केले जाईल. परंतु नवीन यूजर्स जे नवीन सबस्क्रिप्शन मॉडेलचे सदस्यत्व घेऊ इच्छित नाहीत ते केवळ पोस्ट किंवा व्हिडिओ पाहण्यास आणि खात्याचे अनुसरण करण्यास सक्षम असतील. सदस्यता शुल्क म्हणून 97.52 रूबल भरावे लागतील.

 हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news