Elon Musk's Starlink : मस्क यांच्या मालकीची 'स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेट सेवा' लवकरच भारतात? | पुढारी

Elon Musk's Starlink : मस्क यांच्या मालकीची 'स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेट सेवा' लवकरच भारतात?

पुढारी ऑनलाईन डेस्क : एक्सचे (ट्विटर) सीईओ एलन मस्क यांच्या मालकीची स्टारलिंक ही सॅटेलाइट इंटरनेट सेवा लवकरच भारतात येण्याची अधिक शक्यता आहे. भारतीय दूरसंचार विभागाचे अधिकारी २० सप्टेंबर रोजी यासंदर्भात बैठक घेण्याची शक्यता आहे. या बैठकीत स्टारलिंकला देशात काम करण्याची परवानगी द्यायची की नाही यासंदर्भातील निर्णय (Elon Musk’s Starlink) घेण्यात येणार असल्याचे वृत्त ‘इंडिया टुडे‘ने दिले आहे.

एलन मस्कच्या मालकीच्या स्टारलिंकची उपग्रह इंटरनेट सेवा जगभरातील ३२ देशांमध्ये उपलब्ध आहेत. रशियाबरोबरच्या युद्धादरम्यान कम्युनिकेशन ब्लॅकआउट दरम्यान युक्रेनमध्ये त्याच्या सेवांनी देखील मोठी भूमिका बजावली आहे. स्टारलिंकने गेल्या वर्षी भारतीय दूरसंचार विभागाकडे ग्लोबल मोबाइल पर्सनल कम्युनिकेशन बाय सॅटेलाइट (GMPCS) परवान्यासाठी अर्ज केला होता. Starlink ने 2021 मध्ये भारतात प्री-बुकिंग चॅनेल उघडले. तथापि, सरकारने कंपनीला प्री-बुकिंग चॅनेल बंद करण्यास भाग पाडले आणि त्याऐवजी ऑपरेट करण्यासाठी परवान्यासाठी अर्ज करण्यास सांगितला होता. स्टारलिंकची अधिकृत वेबसाइट अजूनही (Elon Musk’s Starlink) भारतात या सेवेला मंजुरी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे.

एका अधिकाऱ्याचा हवाला देत अहवालात नमूद करण्यात आले आहे की, “आम्हाला कोणत्याही कंपनीला परवान्याशिवाय सेवा देण्यास प्रोत्साहन द्यायचे नव्हते. स्काईपच्या बाबतीत आम्ही याचा अनुभव घेतला, आम्ही कंपनीला परवाना प्रणालीमध्ये आणू शकलो नाही. त्यामुळे सरकार आणि भारतीय दूरसंचार विभागाच्या परवानगीनंतरच एलन मस्क यांच्या मालकीच्या स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेटला आपली सेवा भारतात देता (Elon Musk’s Starlink) येणार आहे.

हेही वाचा:

Back to top button