Donald Trump & Elon Musk : डोनाल्ड ट्रम्प यांना अटक केल्यास ट्रम्प प्रचंड मतांनी निवडून येतील- एलॉन मस्क | पुढारी

Donald Trump & Elon Musk : डोनाल्ड ट्रम्प यांना अटक केल्यास ट्रम्प प्रचंड मतांनी निवडून येतील- एलॉन मस्क

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी (दि.१८) आपल्या सोशल मीडियावर दावा केला आहे की, त्यांना लवकरच अटक केली जावू शकते. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे असेही म्हंटल आहे की, ट्रम्प यांनी म्हटलं आहे की मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट अॅटर्नीच्या कार्यालयाकडून त्यांना अटक करण्यात येईल. यानंतर टेस्ला आणि ट्विटरचे सीईओ  एलॉन मस्क यांनी म्हंटल आहे की, जर डोनाल्ड ट्रम्प यांना अटक केल्यास ते मोठ्या विजयाने राष्ट्राध्यक्ष पुन्हा निवडून येतील. वाचा सविस्तर बातमी. (Donald Trump & Elon Musk)

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्याला मंगळवारी (दि.२१) मॅनहॅटन जिल्हा वकील कार्यालयाने त्यांच्यावर आरोप लावून अटक करणार आहे. याबद्दल त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. या अटकेचा निषेध करण्यासाठी त्याने त्याच्या समर्थकांनाही बोलावले, असे सीएनएनचे वृत्त आहे. या वृत्ताला उत्तर देताना मस्क यांनी ट्विट केले की, “असे झाले तर, ट्रम्प पुन्हा एकदा प्रचंड मतांनी निवडून येतील.” फॉक्स न्यूजच्या वृत्ताला ट्विटरच्या सीईओने ही प्रतिक्रिया दिली.

 काय आहे प्रकरण? 

डोनाल्ड अटक प्रकरण चर्चेत आहे. हे प्रकरण पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनियल उर्फ स्टेफनी क्लिफर्डशी  संबंधित आहे. स्टॉर्मी डेनियल चे म्हणंण आहे की, तिचे आणि ट्रम्प यांचे १० वर्षापूर्वी प्रेमसंबंध होते. पण हे वक्तव्य  ट्रम्प यांनी फेटाळून लावले आहे. तर त्यांनी स्टेफनी क्लिफर्ड आणि आपले संबंध जाहीर करु नये यासाठी 1.30 लाख डॉलर्स दिले होते. असा आरोप आहे. या प्रकरणाची आता चौकशी केली जात आहे.

दोन वर्षांच्या बॅननंतर ट्रम्प यांची पहिली पोस्ट

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ‘मी परत आलो आहे’, असे म्हणत दोन वर्षांच्या बॅननंतर शुक्रवारी (दि.१७) फेसबुकवर आपली पहिली पोस्ट लिहिली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सर्व सोशल मीडिया खात्यावर दोन वर्षांपूर्वी बंदी घातली होती. त्यामध्ये फेसबुक-इन्स्टाग्राम, ट्विटर यांचाही समावेश होता. काही महिन्यांपूर्वी मस्क यांनी ट्विटर खरेदी केले त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते पुन्हा सुरू केले. त्यापाठोपाठ फेब्रुवारीमध्ये मेटाने ट्रम्प यांचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम खाते पुन्हा रिस्टोअर केले होते. तर शुक्रवारी (दि. 17) यु ट्यूबने देखील ट्रम्प यांच्यावरील बंदी हटवली.

हेही वाचा 

Back to top button