महाराष्ट्र केसरी : दोस्तीतील कुस्तीत शेख ठरला सिकंदर

महाराष्ट्र केसरी : दोस्तीतील कुस्तीत शेख ठरला सिकंदर

सातारा : पुढारी वृत्तसेवा

अमरावतीचा पैलवान माऊली जमदाडे विरुद्ध वाशिमचा पैलवान सिकंदर शेख या जिगरी दोस्तांमध्ये माती गटात सेमी फायनलची कुस्ती झाली. हे दोघेही कोल्हापूर येथील गांगवेश तालमीत सराव करतात. त्यामुळे दोघांना एकमेकांचे डावपेच माहीत होते. या लढतीत सिकंदर शेख याने माऊली जमदाडे याला चितपट केले. या लढतीत सिकंदर याने ६ विरुद्ध १ गुणांनी विजय मिळवला.

सातारा येथे ६४ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा मंगळवार (५ एप्रिल) पासुन सुरु आहेत. शुक्रवारी पावसामुळे व्यत्यय येऊन उपांत्य फेरीच्या लढती रद्द कराव्या लागल्या होत्या. दरम्यान, महाराष्ट्र केसरीचा मानाचा किताब कोण पटकावणार? कुणा-कुणामध्ये रंगणार मुख्य लढत याची कुस्तीप्रेमींना उत्कंठा लागून राहिली आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news