म्हशींनी भरलेला ट्रक लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकला धडकला; २ व्यक्तींसह १२ म्हशी ठार | पुढारी

म्हशींनी भरलेला ट्रक लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकला धडकला; २ व्यक्तींसह १२ म्हशी ठार

बुलडाणा ; पुढारी वृत्तसेवा : म्हशींची वाहतूक करणारा ट्रक रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या लोखंडी सळ्यांच्या ट्रकला पाठीमागून धडकला. या भीषण दुर्घटनेत ट्रकच्या केबीनमध्ये बसलेले दोनजण व ट्रकमधील 12 म्हशी जागीच ठार झाल्या. तसेच एक व्यक्ती व एक म्हैस जबर जखमी झाली.

मेहकर- चिखली मार्गावर मुंगसरी गावच्या फाट्याजवळ आज (शुक्रवार) हा अपघात झाला. पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, म्हशींनी खचाखच भरलेला आयशर ट्रक मेहकर शहराकडून चिखलीकडे येत होता. त्याचवेळी मुंगसरी फाट्याजवळ लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रक रस्त्याच्या कडेला थांबलेला होता. या ट्रकला म्हशींची वाहतूक करणा-या ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली.

या घटनेत ट्रकच्या केबीनमधील दोन जणांसह ट्रकमधील 12 म्हशी ठार झाल्या. चिखली पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना मदत केली. जखमी व्यक्तींना बुलडाणा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Back to top button