संभाजीराजेंकडून ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना

संभाजीराजे
संभाजीराजे

पुणे : पुढारी वृत्तसेवा

राज्यसभेची निवडणूक आपण अपक्ष म्हणूनच लढविणार असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी बुधवारी पुण्यात एका पत्रकार परिषदेत जाहीर केले. तसेच स्वराज्य या नावाने संघटना स्थापन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यसभेतून नुकतेच निवृत्त होत असलेल्या खासदार संभाजीराजे यांनी गेल्या काही दिवसांत अनेक राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. तसेच कोल्हापुरातील एका पत्रकार परिषदेत आपली भूमिका १२ तारखेला जाहीर करणार असे सांगितले होते. त्यातच दोन दिवसांपूर्वी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने ते काय निर्णय जाहीर करणार याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते.

ते म्हणाले, मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. मात्र, जनसेवा करायची असल्यास राजसत्ता हवी. यासाठी मी दोन निर्णय घेतले आहेत. पहिला निर्णय मी राज्यसभेचा निर्णय घेतला आहे. सहा जागा रिक्त होत आहेत. 3 भाजप, प्रत्येकी एक महाविकास आघाडी. सहावी सीट येथे संख्याबळावर एक सदस्य निवडून येऊ शकतो. महाविकास आघाडी कडे 27 तर भाजप कडे 22 मते आहेत. ही निवडणूक मी अपक्ष लढवणार आहे. 29 अपक्ष आमदार आहेत त्यांनी सहकार्य करावे. मी त्यांना भेटणार आहे. छत्रपती घराणे म्हणून नाही तर मी पक्ष विरहित काम करत आहे. मी केलेली कामे पाहून मला मते द्यावीत, असे मी आवाहन करणार आहे. सगळ्या पक्षांच्या नेत्यांना विनंती करणार आहे.

स्वराज्य नावाने संघटना स्थापणार

अनेक संघटना, समाज मला छत्रपती घराणे म्हणून पाठबळ देतात.. ही ताकत संघटित करायची आहे. या माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. या सगळ्यांना संघटित करण्यासाठी समाजाला दिशा देण्यासाठी, मी संघटना स्थापन करणार आहे. 'स्वराज्य' अशा नावाने उभारणाऱ्या या संघटनेचा प्रसार करण्यासाठी लवकरच राज्यव्यापी दौरा करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्यातील लोकांनी छत्रपती घराण्यावर नितांत प्रेम केले. यामुळे मी राज्य पिंजून काढले. 2007 पासून मी गोंदिया सोडला तर संपूर्ण राज्य अनेक विषयांसाठी पिंजून काढला. छत्रपती शिवराय व शाहू महाराजांचे विचार पोहोचवण्याचे काम केले. शेतकरी प्रश्न, कामगार, विद्यार्थी प्रश्न, अतिवृष्टीमध्ये मी फिरू शकलो. यातून ऊर्जा मिळाली. देवेंद्र फडणवीस, मोदी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मला बोलवून विनंती केली. राष्ट्रपती नियुक्त खासदार स्वीकारावे अशी विनंती केली. 2016 ला मी पद स्वीकारले. मी त्यांचे आभार व्यक्त करतो, असे छत्रपती संभाजी महाराज म्हणाले.

मी पहिल्यांदा मोदींना भेटलो होतो त्यांना शाहू महाराज यांचे पुस्तक दिले होते. त्यामधे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांप्रमाणे वाटचाल असणार हे माझे मनोगत लिहिले होते. या सहा वर्षात मी समाजहिताच्या दृष्टीने कामे केली. व्यापक स्वरूपात शिवाजी महाराज जयंती दिल्लीत सुरू केली. शाहू जयंती पहिल्यांदा दिल्ली येथे व्यापक स्वरूपात सुरू केली. शिवराज्याभिषेक सोहळ्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप दिले. संसदेत मी मोजके बोललो. पण त्यामध्ये शिवाजी, शाहू, आंबेडकर यांच्या विचारसरणीवरच बोललो. गडकोट किल्ल्यांसाठी 5 मेला आझाद मैदानावर 2017 ला, स्टेजवर जाण्याचे धाडस केले नाही. आरक्षण रद्द झाले त्यावेळी मी महाविकास आघाडीची बाजू घेतली. मी केवळ समाज हितासाठी भूमिका घेतली. राष्ट्रपती नियुक्त खासदार असल्याने मी त्या पदाची गरिमा राखली. रायगड किल्ल्याचे जतन केवळ माझ्या पाठपुराव्यामुळे होऊ शकले, असेहीते म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news