पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त काल (दि.२३) रात्री पासून येत आहे. मात्र त्यांच्या कुटूंबिंयाकडून निधनाचे (Vikram Gokhale Health Update) वृताबाबत नकार देण्यात आला आहे. तर दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने अद्याप याची पुष्टी केलेली नाही. तसेच रुग्णालय प्रशासनाकडून अजून याची अधिकृत घोषणा केलेली नाही. या संदर्भात आज सकाळी ९.३० च्या दरम्यान रुग्णालय प्रशासनाकडून माहिती देण्यात येईल.
पीटीआयच्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून विक्रम गोखले यांना मधुमेहाचा त्रास जाणवत आहे. त्यातच त्यांना जलोदर झाल्यामुळे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या 15 दिवसांपासून उपचार सुरु होते. बुधवारी त्यांची प्रकृती खालावली होती. यानंतर उपचारांना ते प्रतिसाद देणे थांबवले होते. त्यानंतर काल रात्रीपासून गोखले यांच्या निधनाचे वृत्त सगळीकडे पसरत आहे. याबाबत दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाला विचारले असता त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.
गोखले कुटुंबियांनी याबाबत म्हटले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ते कोमात गेले आहे. त्यांनी कालपासून स्पर्शाला प्रतिसाद देत नाहीत मात्र त्यांच्या निधन झालेले नाही, असे त्यांच्या पत्नीने म्हटले आहे. तर त्यांच्या मुलीने देखील निधनाच्या वृत्ताला नकार दिला आहे.
दरम्यान, या वृत्तामुळे अनेक सिनेसृष्टीतील कलाकरांनी त्यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजलीही वाहिली.
हेही वाचा