दागिने पॉलिशसाठी हळदीच्या पाण्यात टाकली अन् डाेळ्यादेखत ३ लाखांच्या दागिण्यांवर डल्‍ला | पुढारी

दागिने पॉलिशसाठी हळदीच्या पाण्यात टाकली अन् डाेळ्यादेखत ३ लाखांच्या दागिण्यांवर डल्‍ला

यवतमाळ ; पुढारी वृत्‍तसेवा दागिने पॉलिश करून देतो, असे सांगून दोन भामट्यांनी महिलांचे दोन लाख ७६ हजारांचे दागिने लंपास केले. ही घटना विठ्ठलवाडी परिसरातील गणेशनगरमध्ये (सोमवार) घडली. केशव संतोषराव वानखडे (रा. गणेशनगर, विठ्ठलवाडी) यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सोमवारी सकाळी गणेशनगरमध्ये दुचाकीवरून दोन चोरटे आले. त्यांनी गुजरातमधील एका कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगितले. घरासमोर बसून असलेल्या महिला उज्वला वानखडे, मंदा काकडे, आरती पेटकर यांच्याशी संशयीत आरोपींनी बातचीत सुरू केली. घरातील सर्व भांडी एकदम चकाचक करून देतो, असे सांगितले. महिलांनी त्यांना काही भांडी दिली. त्‍या दोघांनी

बोलता-बोलता सोन्याचेही दागिने अगदी नवीन करतो, असे सांगितले. चोरट्यांनच्‍या बोलण्यावर विश्वास ठेवून उज्ज्वला वानखडे यांनी ६० ग्रॅम वजनाच्या बांगड्या, एक अंगठी, कानातील वेल, तर मंदा काकडे यांनी ५ ग्रॅम वजनाचे दोन कानातले टॉप्स, चार ग्रॅम वजनाचे कानवेल आरोपींकडे दिले.

यानंतर दोघा इसमांनी पाण्यात हळद व इतर पावडर टाकून त्या मिश्रणामध्ये दागिने टाकले. दहा मिनिटे या पाण्यात दागिने राहू द्या, नंतर काढून घ्या असे सांगून ते दोघेही तेथून निघून गेले.  महिलांनी पाण्याचा डबा बघितला असता त्यात एकही दागिना मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ही बाब पतीला सांगितली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

हेही वाचा :  

Back to top button