Heart Attack And Gym : जीममध्ये ‘या’ चुका टाळा; अन्यथा हार्टअटॅकचा धोका | पुढारी

Heart Attack And Gym : जीममध्ये 'या' चुका टाळा; अन्यथा हार्टअटॅकचा धोका

पुढारी ऑनलाईन डेस्क : अलिकडे फिट आणि सुडौल दिसण्याकडे सर्वच वयोगटाचा कल वाढला आहे. जो तो स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी विविध उपाय करताना दिसतो. योगासन, ऍरोबिक, डाएट प्‍लॅन तसेच जीमच्या माध्यमातून शरीराला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न लोक करतात. अनेक जण जीममध्ये यासाठी अनेक तास खर्ची घालतात व हॉलिवूड आणि बॉलिवूच्या हिरोप्रमाणे स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतात; पण अलिकडे जीममध्‍ये वर्कआऊट (व्‍यायाम) करताना ह्दयविकाराने ( हार्टअटॅक ) मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. नुकतेच ११ नोव्हेबर रोजी प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी यांचा जीममध्ये व्यायाम करताना मृत्यू झाला.  त्यापूर्वी कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनादेखील जीममध्ये वर्कआऊट करताना ह्रदयविकाराचा झटका आला होता. उपचार सुरु असताना त्‍यांचा मृत्यू झाला. गेल्या काही वर्षांत जीममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. चला तर जाणून घेऊया जीममध्‍ये वर्कआउट करताना हार्ट अटॅक का येतो आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याविषयी (Heart Attack And Gym)

हृदयविकाराचा झटका म्हणजे नेमके काय? (Heart Attack And Gym)

हृदयविकाराचा झटका हा रक्ताभिसरणाचा विकार आहे. एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येतो जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा प्रणालीमध्ये अडथळा येतो. काहीवेळा हृदयाच्या स्नायूंच्या भागामध्ये ऑक्सिजन समृद्ध रक्ताचा प्रवाह मंदावतो किंवा काही प्रकरणांमध्ये अवरोधित होतो. अशा परिस्थितीत, रक्त प्रवाह शक्य तितक्या लवकर सामान्य न केल्यास, स्नायूंमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे, हृदयाचे स्नायू निकामी होऊ लागतात आणि परिणामी हृदयाचे ठोके थांबतात.

जीममध्‍ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका का येतो?

कोणत्याही व्यक्तीने शारीरिक क्षमता लक्षात घेऊन व्यायाम केला पाहिजे, कारण प्रत्‍येकाच्‍या  शरीराची विशिष्ट क्षमता असते. अनेकदा, शारीरिक क्षमता कमी असूनही अनेक लोक जिममध्ये अतिव्यायाम करतात. ज्याचा त्याच्या हृदयावर वाईट परिणाम होतो. (Heart Attack And Gym)

मॅरेथॉन धावपटूंवर केलेल्या एका अभ्यासानुसार, जेव्हा लोक धावांची शर्यत पूर्ण करतात तेव्हा त्यांच्या रक्ताचे नमुने हृदयाच्या नुकसान करणारे बायोमार्कर बनतात. पण, कालांतराने ते स्वतःहून आपोआप ठीक होतात. जेव्हा आपले हृदय सतत तणावाखाली असते तेव्हा ते तात्पुरते क्षणात गंभीर स्वरूप धारण करतात. याशिवाय ज्या लोकांना आधीच हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनाही या त्रासाची तीव्रता अधिक असते.  (Heart Attack And Gym)

Heart Attack And Gym:  कोणत्या लोकांना हृदयविकाराचा जास्त धोका ?

हृदयविकाराचा धोका तुमच्या वयावरही अवलंबून असतो, असे मानले जात होते. दररोज व्यायाम करणाऱ्या तरुणांना हृदयविकाराचा धोका कमी असतो, तर आश्चर्यकारक म्हणजे रोज व्यायाम करणाऱ्या वृद्धांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो, असे मानले जाते. परंतु गेल्या काही वर्षांत तरुणांमध्येही हृदयविकाराचा धोका खूप जास्त असल्याचे दिसून आले आहे. यामुळे हृदयविकारासाठी अनेक घटक कारणीभूत असतात हे आता स्‍पष्‍ट झाले आहे.

व्यायाम करताना या गोष्टी टाळा

मेडिकल न्यूज टुडेच्या मते, काही जण आपलं शरीर पिळदार करण्‍यासाठी हेवी वेट ट्रेनिंग सुरू करतात. असे केल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत, जिममध्ये गेल्यावर लगेचच हेवी वेट ट्रेनिंग करण्याऐवजी, प्रथम एक ध्येय बनवा आणि त्या ध्येयाकडे हळूहळू वाटचाल करा. कारण शरीरावर अतिरिक्‍त ताण देणे टाळा. हेवी वेट ट्रेनिंग करण्‍यापेक्षा तुमच्‍या शरीराला झेपेल असाच व्‍यायाम करा.

हृदयविकाराचा धोका कसा टाळावा?

जास्त व्यायाम करू नका, तंदुरुस्त राहा त्यामुळे आठवड्यातून काही दिवस मध्यम व्यायाम करणे चांगले आहे. बैठी जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. हृदय निरोगी ठेवण्यासाठी, आपण सक्रिय राहणे महत्वाचे आहे. जर तुम्ही डेस्क जॉबवर काम करत असाल तर दर तासाला उठून थोडे चालत जा. मध्‍यम व्‍यायाम आणि शरीराची योग्‍य काळजी घेवून केलेल्‍या व्‍यायामामुळै तुम्‍ही व्‍यायामावेळी येणार्‍या हार्टअटॅकचा धोका टाळू शकता, असेही मेडिकल न्यूज टुडेने नमूद केले आहे.

Back to top button