Ujjain Rape Case | ज्यांनी १२ वर्षीय बलात्कार पीडित मुलीला मदत नाकारली, त्यांच्यावर कारवाई : MP पोलीस

Ujjain Rape Case | ज्यांनी १२ वर्षीय बलात्कार पीडित मुलीला मदत नाकारली, त्यांच्यावर कारवाई : MP पोलीस

पुढारी ऑनलाईन : मध्य प्रदेशातील उज्जैनमधील अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेने देश हादरला. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ५ जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, मध्य प्रदेश पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ज्यांनी या १२ वर्षांच्या पीडित मुलीची मदत केली नाही. ती मदतीची याचना करत असताना तिला हाकलून लावेल; अशा लोकांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यांना बाल लैंगिक शोषण कायद्यांतर्गत कारवाईला सामोरे जावे लागेल. (Ujjain Rape Case)

लैंगिक अत्याचार झाल्यानंतर पीडित मुलगी रक्तस्त्राव झाल्याच्या अवस्थेत रडत घरोघरी मदत मागत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली.

संबंधित बातम्या

एखाद्या गुन्ह्याची तक्रार नोंदवण्यात अयशस्वी झाल्याबद्दल त्यांना लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ अंतर्गत आरोपांना सामोरे जावे लागू शकते, असे अहवालात म्हटले आहे. (Ujjain Rape Case)

या प्रकरणी भरत सोनी या ऑटो रिक्षा चालकाला गुरुवारी (२८ सप्टेंबर) अटक करण्यात आली. या प्रकरणी कारवाईसाठी विशेष प्रत्यत्न केले जात असल्याचे मध्य प्रदेश पोलिसांचे म्हणणे आहे. मुख्य आरोपींशी संबंध असलेल्या शेकडो लोकांची चौकशी केली जात आहे. ७०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज स्कॅनिंग केले जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.

पत्रकारांशी बोलताना आरोपी सोनी याच्या वडिलाने त्यांच्या मुलाच्या कथित गुन्ह्याबद्दल सांगितले. "हे एक घृणास्पद कृत्य आहे. मी त्याला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलो नाही. पोलिस स्टेशन अथवा कोर्टातही जाणार नाही. माझ्या मुलाने गुन्हा केला आहे. त्याला फाशी दिली पाहिजे."

या घटनेतील ऑटो रिक्षाचालक असलेला मुख्य आरोपी भरत सोनी याने गुन्ह्याच्या ठिकाणी नेताना पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला दुखापत झाली, असेही पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, कोणत्याही वकिलाने न्यायालयात त्याची बाजू मांडू नये, असे आवाहन स्थानिक बार असोसिएशनने केले आहे.

उज्जैनमध्ये १२ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला जखमी अवस्थेत रस्त्यावर सोडून दिले होती. पीडित मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत उज्जैनच्या रस्त्यांवर लोकांचे दरवाजे ठोठावत मदत मागत राहिली, पण कोणीही तिला मदत केली नाही. तिला हाकलून लावण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून ही हृदयद्रावक घटना समोर आली. या प्रकरणी आता पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई सुरु केली आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news