Ujjain Case : तिच्या किंकाळ्या ऐकून अश्रू रोखू शकलो नाही ; पोलिस अधिकाऱ्याने सांगितली आपबीती | पुढारी

Ujjain Case : तिच्या किंकाळ्या ऐकून अश्रू रोखू शकलो नाही ; पोलिस अधिकाऱ्याने सांगितली आपबीती

पुढारी ऑनलाईन : उज्जैनमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. वाट चुकलेल्या मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिच्यावर हा अत्याचार केला गेला. त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेतील ही मुलगी मदत मिळवण्यासाठी जवळपास आठ किलोमीटर चालली देखील. अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या या मुलीच्या मदतीसाठी आता उज्जैनमधील खाकी सरसावली आहे. अत्यंत वाईट अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या या मुलीला दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी रक्त दिलं.

इन्स्पेक्टर अजय वर्मा यांनी त्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायची तयारी दर्शवली आहे. वर्मा म्हणतात, “ हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान तिच्या किंकाळ्या ऐकून मी माझे अश्रू रोखू शकलो नाही. मला वाटलं ईश्वराने तिला इतक्या वेदना का दिल्या असाव्यात ? तिच्या घराचे तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊ शकत नसतील तर मी ती घेण्यास उत्सुक आहे. जर तिच्या कुटुंबाने परवानगी दिल्यास मी तिला दत्तक घेण्यासही तयार आहे.’

पोलिसांनी एका रिक्षाचालकाला ताब्यात घेतलं आहे. घटनास्थळावर पोलिस गेले असता तिथून हा रिक्षाचालक संशयास्पदरित्या पळून जाताना तो जखमी झाला आहे. भरत सोनी असं या नराधमाचे नाव आहे. सोनीच्या रिक्षात रक्ताचे डाग आढळले असून त्याची चौकशी केली जात आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button