Ujjain case update : अत्याचारांच्या खुणा घेऊन ती मदतीसाठी चालली तब्बल 8 किलोमीटर... | पुढारी

Ujjain case update : अत्याचारांच्या खुणा घेऊन ती मदतीसाठी चालली तब्बल 8 किलोमीटर...

Pudhari online : उज्जैन अत्याचार प्रकरणी आता महत्त्वाची अपडेट समोर येताना दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका रिक्षाचालकाला ताब्यात घेतलं आहे. घटनास्थळावर पोलिस गेले असता तिथून हा रिक्षाचालक संशयास्पदरित्या पळून जाताना तो जखमी झाला आहे. भरत सोनी असं या नराधमाचे नाव आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी चिमुकलीचे कपडे जप्त केले आहेत. यादरम्यान रिक्षावाल्यासोबत झालेल्या झटापटीत पोलिसही जखमी झाले आहेत.

पोलिस म्हणतात, ‘ घटनेच्या दिवाशीचे काही व्हीडियो आमच्या हाती आहेत. यामध्ये त्या मुलीला सोनी हा रेल्वेस्टेशनवरुन जीवनखेडी येथे घेऊन गेला. तिथे त्याने या मुलीवर अत्याचार केल्याचे समोर येत आहे. या दरम्यान मुलगी या रिक्षाचालकासोबत जात असल्याचे cctv फुटेजही समोर आलं आहे. यामध्ये अत्याचारानंतर या मुलीने जवळपास 8 किमी चालत मदत मागितली. पण दुर्दैवाने तिला कोणीच मदत केली नाही.

या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना आरोपी बनवलं आहे. यामध्ये भरत सोनीसह राकेश मालवीय नावाच्या व्यक्तीचा समावेश आहे. या मुलीची मेडिकल चाचणी केली असता तिच्यावर सामूहिक बलात्काराच्या खुणा आढळल्या नाहीत असं पोलिसांनी स्पष्ट केलं.

सतनामधून गायब झाली होती मुलगी

ही मुलगी वाईट अवस्थेत उज्जैनमध्ये सापडली असली तरी तिचं मूळ गाव सतना असल्याचं सांगितलं गेलं. 24 सप्टेंबरपासून ती बेपत्ता झाली होती. संबंधित जिल्ह्याच्या पोलिस स्टेशनमध्ये ती बेपत्ता असल्याचा रिपोर्टदेखील आहे.

कुटुंबाचीही वाताहात

या मुलीची आई तिला लहानपणीच सोडून गेलेली आहे. तर वडील मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचं सांगण्यात आलं. मुलगी आठव्या इयत्तेत शिकत असून आजोबा आणि मोठ्या भावासह राहात असल्याचं समोर आलं.

हेही वाचा :

Back to top button