Ujjain Rape on Minor Girl: संतापजनक! उज्जैनमध्ये अल्पवयीन मुलीला अत्याचार करून रस्त्यावर फेकले; अर्धनग्न, रक्तबंबाळ अवस्थेत पीडिता मागत होती मदत | पुढारी

Ujjain Rape on Minor Girl: संतापजनक! उज्जैनमध्ये अल्पवयीन मुलीला अत्याचार करून रस्त्यावर फेकले; अर्धनग्न, रक्तबंबाळ अवस्थेत पीडिता मागत होती मदत

पुढारी ऑनलाईन: उज्जैनमध्‍ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. इतकेच नाही तर नराधमांनी पीडित मुलीवर अत्याचार करून तिला रस्त्यावर फेकले आहे. यानंतर ही अल्पवयीन मुलगी अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेतच अनेकांकडे मदत मागत आहे; परंतु तिच्या मदतीसाठी कोणीही पुढे येत नसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पीडित मुलीला उपचारासाठी इंदूर येथे दाखल करण्‍यात आले. या प्रकरणाच्‍या चाैकशीसाठी  उज्जैन एसपींनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापन केली आहे. ( Ujjain Rape on Minor Girl)

या प्रकरणी उज्जैनचे पोलिस अधीक्षक सचिन शर्मा यांनी सांगितले की, पीडित अल्पवयीन मुलगी उत्तर प्रदेशातील असण्याची शक्यता आहे. महाकाल पोलिस स्टेशन परिसरात ही मुलगी बेशुद्ध अवस्थेत सापडली. तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, एका आश्रमासमोर या १२ वर्षीय चिमुरडीवर अज्ञातांनी अत्याचार केल्याची घटना मंगळवारी (दि.२६) उघडकीस आली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. (Ujjain Rape on Minor Girl)

या प्रकरणातील पीडितीने अत्याचार प्रकरणाबाबत कोणतीही माहिती दिली नाही, मात्र तिच्या वैद्यकीय अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी महाकाल पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा संशय पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिला उपचारासाठी इंदूरला हलविण्‍यात आले आहे. या प्रकरणाच्‍या तपासासाठी तातडीने ‘एसआयटी’ स्थापन केली आहे. ( Ujjain Rape on Minor Girl)

हेही वाचा :

Back to top button