“मी तिला कपडे दिले, पोलिसांना फोन केला…”उज्जैनमधील पुजारी ‘त्‍या’ पीडित मुलीच्‍या मदतीला धावला | पुढारी

"मी तिला कपडे दिले, पोलिसांना फोन केला..."उज्जैनमधील पुजारी 'त्‍या' पीडित मुलीच्‍या मदतीला धावला

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिला अर्धनग्‍न अवस्‍थेत रस्त्यावर फेकल्‍याची संतापजनक आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना मध्‍य प्रदेशमधील उज्‍जैन येथे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. आता या पीडित मुलीला मदत करण्‍यासाठी उज्‍जैनमधील पुजारी समोर आला आहे. त्‍याने पीडित मुलीला कशी मदत केली याची माहिती दिली. यासंदर्भातील वृत्त ‘एनडीटीव्‍ही’ने दिले आहे. ( Ujjain 12 year girl viral video )

तिला बोलताही येत नव्हते…

२५ सप्‍टेंबर रोजी सकाळी १२ वर्षीय मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत उज्जैनपासून १५ किलोमीटर अंतरावर बडनगर रोडवर असलेल्या दांडी आश्रमात पोहोचली. आश्रमातील पुजारी राहुल शर्मा हे तिच्‍या मदतीसाठी पुढे आले. त्‍यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, सोमवार, २५ सप्‍टेंबर रोजी सकाळी 9.30 च्या सुमारास ते आश्रमाच्या बाहेर काही कामासाठी बाहेर जात होते. त्‍यावेळी आश्रमाच्‍या प्रवेशव्‍दाराजवळ त्‍यांना एक अर्धनग्न मुलगी दिसली.मी तिला माझे कपडे दिले. तिला रक्तस्त्राव होत होता. तिला बोलता येत नव्हते. तिचे डोळे सुजले होते. आम्ही तिचे नाव विचारले, तिच्या कुटुंबाबद्दल विचारले. तसेच तिला सुरक्षित ठिकाणी असल्‍याची खात्री दिली. तिने तिच्या कुटुंबाबद्दल माहिती द्‍यावी यासाठी आम्‍ही प्रत्‍यन केला; पण ती खूप घाबरली होती. तिला बाोलता येत नव्‍हते ( Ujjain 12 year girl viral video )

Ujjain 12 year girl viral video : तिला काहीतरी सांगायचे होते…

राहुल शर्मा यांनी सांगितकी, आश्रमाच्‍या प्रवेशव्‍दाराजवळ मुलगी उभी होती. मी तिला कपडे दिले. तसहेच तत्‍काळ 100 नंबरवर कॉल केला. मात्र हेल्पलाइनवर मला पोलिसांपर्यंत पोहोचता आले नाही, तेव्हा मी महाकाल पोलीस ठाण्‍यात फोन केला. 20 मिनिटांत पोलीस आश्रमात पोहोचले. जेव्हा इतर कोणीही तिच्या जवळ यायचे तेव्हा ती माझ्या मागे लपण्याचा प्रयत्न करायची. तिला काहीतरी सांगायचे हेते. एखाद्या जागेबद्दल बोलत होती. परंतु मला त्या जागेबद्दल समजू शकले नाही ; मग पोलिस आले आणि तिला घेऊन गेले.

पीडित चिमुरडीची मदतीसाठी याचना, मात्र कोणीही समोर आले नाही

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये जखमी आणि अर्धनग्न मुलगी मदतीसाठी एका घरातून दुसऱ्या घराकडे जात आहे, मात्र तिला कोणीही मदत करत नसल्‍याचे दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती घराबाहेर गेली तेव्हा एक व्यक्ती तिचा पाठलाग करताना दिसत आहे. बडनगर रोडवर असलेल्या दांडी आश्रमात पोहोचल्यानंतरच तिला मदत मिळाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button