पुणे : दोन महिलांचे अपहरण करणाऱ्या एका सराईत गुंडाला त्याच्या साथीदारासह गून्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने उत्तमनगर परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत. पुण्यातील उत्तमनगर परिसरात दोन महिलांना डांबून ठेऊन जीवे ठार मारण्याची धमकी देत सतरा लाख रुपये खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी वैभव भास्कर पोखरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बाबुलाल मोहोळ (वय 45), रा. सरडे बाग उत्तमनगर, अमर मोहिते (वय 39), रा. गणेश नगर, प्रदीप नलवडे (वय 38),भूगाव ), अक्षय फड(वय 24) रा.वारजे यांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुणे स्टेशन येथे स्टॉल मिळवून दिले नाहीत म्हणून आमचा सहा लाखाचा तोटा झाला आहे. असे सांगत त्यांचे अपहरण करत त्यांना डांबून ठेऊन मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देऊन सतरा लाख रुपये खंडणीची मागणी केली होती. या प्रकरणाची दखल घेत गून्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने डांबून ठेवलेल्या ठिकाणाचा शोध घेत महिलांची सुखरूप सुटका केली आहे. ही कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, मा. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, मा. सहा पोलीस आयुक्त, सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक 2 गुन्हे शाखाचे पो. नि प्रताप मानकर, पो. उप. नि श्रीकांत चव्हाण, सहा. फौ विजय गुरव यांनी केली आहे.
हेही वाचा