नाशिक : स्काॅर्पिओच्या धडकेत दुचाकी जळून खाक, दोघे गंभीर जखमी | पुढारी

नाशिक : स्काॅर्पिओच्या धडकेत दुचाकी जळून खाक, दोघे गंभीर जखमी

 पंचवटी  : पुढारी वृत्तसेवा

म्हसरूळ-मखमलाबाद लिंक रोडवरील कणसारा चौकात बुधवारी (दि.१३) रात्री स्काॅर्पिओची धडक बसून दुचाकी जळून खाक झाली. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून, स्काॅर्पिओ चालकास म्हसरूळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की , म्हसरूळ -मखमलाबाद लिंक रोडवरील कणसारा चौकात बुधवारी रात्रीच्या सुमारास वेगात चाललेल्या स्काॅर्पिओ (क्र. एमएच १५, सीएम ५८५४) ने रस्ता ओलांडत असलेल्या दुचाकीला ( क्र. जीजे ३०, ई ५४७८) धडक दिल्याने दुचाकी पेटली व काही क्षणात जळून खाक झाली . दुचाकीचालक व त्याचा जोडीदार गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत पोलिस कर्मचारी सोनीराम लहानू जाधव यांनी म्हसरूळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्काॅर्पिओचा चालक गणेश विजय लहरे (वय ३३, रा. राजविलास सोसायटी, बोरगड, म्हसरूळ, नाशिक) याच्यावर अपघाताचा गुन्हा दाखल करत त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संबधित बातम्या :

चौकात पांढरे पट्टे मारणे गरजेचे

म्हसरूळ -मखमलाबाद लिंक रोडवरील कणसारा चौक अतिशय धोकेदायक बनला आहे. या ठिकाणी भाजीबाजार भरत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यामुळे अपघात नित्याचाच झाला आहे. रात्रीच्या वेळी हा चौक वाहनचालकांच्या लक्षात येत नाही. वाहनांचा वेग रात्रीच्या वेळी जास्त असल्याने चौकात नाशिक महानगरपालिकेने पांढर पट्टे मारण्याची गरज आहे . त्यासाठी नाशिक महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती म्हसरूळचे पोलिस निरीक्षक राजू पाचोरकर यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button