नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महानगरपालिका क्षेत्रातील विविध ८८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीसाठी ऑनलाइन केंद्रिभूत पद्धतीने २७ हजार ३६० जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येत आहे. नियमित तीन आणि विशेष चार फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर पाचव्या विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या फेरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शुक्रवारी (दि.१५) अखेरची संधी मिळणार आहे. (Nashik 11th Admission)
संबधित बातम्या
इयत्ता अकरावीच्या ३० टक्क्यांपेक्षा जास्त जागा असल्याने शिक्षण विभागाकडून पाचव्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी सोमवारी (दि.११) प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये २१९ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट देण्यात आली होती. गुरुवारी (दि.१४) सायंकाळपर्यंत १३१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. तर ८८ विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश निश्चित केलेले नाही. दरम्यान, इयत्ता अकरावी प्रवेशप्रक्रियेअंतर्गत १७ हजार ७९३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. तर अद्यापही ९ हजार ५६७ जागा रिक्त जागा आहेत. या रिक्त जागांची संख्या मोठी असल्याने अजून एका विशेष फेरी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :