केंद्राने 10 एप्रिलपासून ज्यांना दुसरा डोस घेऊन 9 महिने पूर्ण झाले आहेत, अशा लाभार्थ्यांना तिसरा डोस केवळ खासगी लसीकरण केंद्रात देण्यास परवानगी दिली आहे. अजून शासकीय लसीकरण केंद्रांत हा डोस सुरू केलेला नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयात 386 रुपये देऊन तिसरा डोस घेण्यासाठी नागरिक अनुत्सुक असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये 18 ते 45 वयोगटात प्रतिदिन 50 ते 175 दरम्यान डोस देण्यात आले, तर 45 ते 60 वयोगटात 200 ते 500 पर्यंत नागरिकांना दैनंदिन डोस देण्यात आले. केवळ 16 एप्रिलला जास्त लसीकरण झाले असून ती संख्या एक हजार होती.