COVID-19 Booster Shots : बुस्‍टर डोससाठी नव्‍याने नोंदणीची गरज नाही

COVID-19 Booster Shots : बुस्‍टर डोससाठी नव्‍याने नोंदणीची गरज नाही

पुढारी ऑनलाईन डेस्‍क
कोराेनाचा नवा व्‍हेरियंट ओमायक्रॉनची सध्‍या चर्चा सर्वत्र आहे. कोरानाच्‍या वाढत्‍या रुग्‍णसंख्‍येमुळे अनेक राज्‍यांमध्‍ये नव्‍याने निर्बंध कडक करण्‍यात आले आहेत. दरम्‍यान, कोराेनाचा मुकाबला करण्‍यासाठी बुस्‍टर डोस ( COVID-19 Booster Shots ) प्रभावी ठरेल, असे वैद्‍यकीय क्षेत्रातील तज्‍ज्ञांनी स्‍पष्‍ट केले आहे. अशातच केंद्र सरकारने बुस्‍टर डोसबाबत महत्त्‍वपूर्ण निर्णय घेतला आहे.

COVID-19 Booster Shots: नोंदणीविना थेट मिळणार बुस्‍टर डोस

कोरोनाचा बुस्‍टर डोस घेण्‍यासाठी नव्‍याने नोंदणी करण्‍याची गरज नाही. १० जानेवारीपासून देशभरात हेल्‍थवर्कर आणि फ्रंटलाईन वर्कर, ६० वर्षांवरील नागरिकांना कोरोना बुस्‍टर डोस दिला जाईल. यासाठी ज्‍यांनी पहिले दोन डोस घेतले आहेत त्‍यांनी आता कोणतीही नोंदणी विना थेट कोरोना बुस्‍टर डोस ( COVID-19 Booster Shots ) मिळणार आहे. लसीकरण केंद्रावर बुस्‍टर डोस मिळणार आहे, असे आरोग्‍य मंत्रालयाने स्‍पष्‍ट केले आहे.

कोरोना बुस्‍टर डोसबाबत आज वेळापत्रक जाहीर केले जाईल. या डोससाठी आता ऑनलाईन नोंदणीचीही सोय सुरु करण्‍यात आली आहे. लसीकरण केंद्रावर जावून थेट लस घेता येणार आहे, असेही आरोग्‍य मंत्रालयाच्‍या सूत्रांनी सांगितले. तसेच ज्‍या कंपनीचे
( कोव्‍हिशिल्‍ड, कोव्‍हॅक्‍सिन ) दोन डोस घेतले असतील त्‍याच कंपनीचाच बुस्‍टर डोस दिला जाईल, असेही यापूर्वी केंद्र सरकारने स्‍पष्‍ट केले आहे.

हेही वाचलं का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news