अजिंक्यतारा किल्ल्यावर आढळले १२० वर्षांपूवीचे २ ब्रिटिशकालीन लोखंडी नक्षीयुक्त्त पिलर (Video)

Ajinkyatara
Ajinkyatara

 सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा शहरालगत असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर अज्ञात इसमाने गवताला आग लावल्यामुळे किल्लाचा बराचसा भाग जळाला होता. त्यामुळे  किल्ल्यावरील भागात असलेल्या पुरातन विहीर नजीक दोन लोखंडी ब्रिटिशकालीन पिलर अजिंक्यतारा श्रमदान मित्रसमूहाचे जय कदम आणि करण पवार यांना किल्लावर आढळून आले. त्यांनी याबाबत सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रविण शिंदे यांना माहिती दिली. त्याच्यावर इंग्रजी मध्ये GEO GAHAGAN AND CO BOMBAY असे लिहिलेले अक्षर आढळून आले आहे.

ही कंपनी साधारण १२० वर्षांपूर्वी मुंबई येथे अस्तित्वात होती. त्यामुळे हे पिलर साधारण १२० वर्षांपूर्वीचा ब्रिटिशकालीन असून त्याचा वापर ब्रिटिश काळात टेल लॅम्प लावण्याकरीता अथवा कंपाउंडचा पिलर म्हणून वापर केला जात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.. हे पिलर चोरीला जाण्याची शकता असल्याने ते छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा येथे आणण्यात आले आहेत. या लोखंडी पिलरची लांबी ७ फूट असून एकाचे वजन साधारण 300 किलो असल्याचे सांगण्यात आले आहे.

पहा व्हिडिओ : सातारा शहरालगत असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर १२० वर्षांपूवीचे २ ब्रिटिशकालीन नक्षीयुक्त्त पिलर सापडले…


हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news