Nashik : युवा शेतकऱ्याची बँकेच्या कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळून गळफास घेत आत्महत्या | पुढारी

Nashik : युवा शेतकऱ्याची बँकेच्या कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळून गळफास घेत आत्महत्या

दिंडोरी, पुढारी वृत्तसेवा : पाडे शिवारालगत शेत असलेल्या संदीप राजेंद्र भुसाळ या शेतकऱ्यांने बँकेच्या कर्जवसुलीच्या तगाद्याला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आज (दि.२७) रात्री एक वाजेच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. या घटनेबाबत मयताचा मावसभाऊ ज्ञानेश्वर संजय शिंदे (रा. वलखेड) यांनी घटनेबाबत दिंडोरी पोलीसांना माहिती दिली.

अधिक माहिती अशी की, संदीप हा आपली आई, भाऊ व आजी यांच्यासोबत राहतो व शेती करतो त्याने शेती व्यवसायासाठी पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज घेतले होते. (Nashik)

परंतु गेल्या तीन वर्षापासून कोरोना परिस्थिती व शेतीतील कमी उत्पन्नामुळे बँकेचे कर्ज भरू शकला नाही. बँकेने गेल्या सहा महिन्यापासून कर्जवसुलीसाठी मोठ्या प्रमाणात तगादा लावल्याने नैराश्यपोटी राहत्या घराच्या मागील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटस ठेवले की मी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. (Nashik)

मयतास उत्तरीय तपासणीसाठी दिंडोरी ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले. पुढील तपास दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलीस करीत आहे. (Nashik)

हेही वाचलतं का?

Back to top button