Hindu Rashtra : “गांधी जयंतीपर्यंत देशाला हिंदू राष्ट्र घोषीत करा अन्यथा…”

"देशाला हिंदू राष्ट्र घोषीत करा अन्यथा..."
"देशाला हिंदू राष्ट्र घोषीत करा अन्यथा..."
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : "मुस्लीम-ख्रिश्चन लोकांचं नागरिकत्व काढून घ्या. येत्या गांधी जयंतीपर्यंत अयोध्येमध्ये भारताला हिंदू राष्ट्र (Hindu Rashtra) घोषित करा अन्यथा आपण शरयू नदीमध्ये जलसमाधी घेऊ", असा इशारा जगद्गुरू परमहंस आचार्य यांनी नरेंद्र मोदी यांच्या सरकारला दिला आहे.

जगद्गुरू परमहंस आचार्य माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, "माझी मागणी आहे की, येत्या गांधी जयंती दिवशी म्हणजेच २ ऑक्टोबरपर्यंत भारताला 'हिंदू राष्ट्र' (Hindu Rashtra) घोषीत करा. नाही तर मी शरयू नदीमध्ये जलसमाधी घेईन. इतकंच नाही तर मोदी सरकारने मुस्लीम आणि ख्रिश्चन लोकांचा नागरिकत्व काढून घ्यावं", असंही त्यांनी माध्यमांशी बोलताना मत मांडले.

मंगळवारी सूरतमध्ये आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी मत मांडले की, "हिंदूत्व एक वैचारिक व्यवस्था आहे. त्याला सोबत घेऊन चालणे आणि एकत्र आणणे, हा विचार याच व्यवस्थेतून मांडला जातो. हिंदूत्व सर्वांना एकत्र आणते, एकत्र वाटचाल करण्याची प्रेरणा देते. ते सर्वांना जोडून धेते आणि सर्वांनाच समृद्ध बनवते", असं मत मांडले.

मोहन भागवतांनी हे विचार मांडलेले असतानाच जगद्गुरू परमहंस आचार्य मुस्लीमांचे आणि ख्रिश्चनांचं नागरित्व काढून घ्या आणि देशाला हिंदू राष्ट्र घोषित करा, असं म्हंटलेलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे समाज माध्यमांवरही तर्कवितर्क काढले जात आहेत.

पहा व्हिडीओ : गोवा प्लॅन Goes Flop

हे वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news