Sudarsan Pattnaik : ‘हृदयात तिरंगा, हातात तिरंगा’… सुदर्शन पटनाईक यांचे अनाेखे वाळूशिल्‍प

Sudarsan Pattnaik 
Sudarsan Pattnaik 
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक (Sudarsan Pattnaik) यांनी आपल्या कलेतुन अनोख्या पद्धतीने देशप्रेम व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या वाळूकलेच्या माध्यमातून देशाबद्दल असलेले प्रेम व्यक्त केले आहे. सुदर्शन पटनाईक महत्त्वपूर्ण घटनांवर आपल्या वाळू शिल्‍पातून कलेतून व्यक्त होत असतात. नुकतेच द्रौपदी मुर्मू जेव्हा देशाच्या १५ व्या राष्ट्रपती झाल्या तेव्हा त्यांनी त्यांच वाळूशिल्प तयार करुन त्यांच अभिनंदन केले होते.

मंगळवारी (दि.२ ऑगस्ट) त्यांनी किनारपट्टीवर एक अनोख वाळू शिल्प केले आहे. या शिल्पकलेत त्यांनी दोन हातात प्रेमाचे प्रतीक असलेले  हृदय  (Heart) तयार केले आहे. यामध्‍ये भारताचा राष्ट्रध्वज दाखवला आहे.  हे वाळुशिल्प त्यांनी अत्यंत सुबकपणे तयार केले आहे.  हे वाळूशिल्प त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट  केले आहे.   ट्विटमध्ये त्यांनी #NewProfilePic असा हॅशटॅग दिला आहे.

Sudarsan Pattnaik
Sudarsan Pattnaik

Sudarsan Pattnaik : कोण आहेत सुदर्शन पटनाईक? 

सुदर्शन पटनाईक हे ओरिसा राज्याचे आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वाळू शिल्पकार अशी त्‍यांची ओळख आहे. त्यांचा जन्म जगनाथपुरी येथे मध्यमवर्गीय कुटूंबात झाला. घरगुती कारणांमुळे त्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही. वयाच्या सातव्या वर्षापासून त्यांनी पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर वाळूशिल्‍प तयार करु लागले. त्यांच्या कलेची दखल देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. त्यांना विवीध पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news