देशात जुलै महिन्यात ६ अब्ज डिजिटल व्यवहार, पंतप्रधानांकडून देशवासियांचे कौतुक | पुढारी

देशात जुलै महिन्यात ६ अब्ज डिजिटल व्यवहार, पंतप्रधानांकडून देशवासियांचे कौतुक

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशातील अनेक नागरिक डिजिटल व्यवहाराला प्राधान्य देत आहेत. अशात जुलै महिन्यात युपीआयच्या माध्यमातून तब्बल ६ अब्ज डिजिटल व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यामुळे देशवासियांचे कौतुक केले आहे. २०१६ नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात डिजिटल व्यवहार झाल्याचे सांगण्यात आले आहे. यासंबंधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या ट्वीटला पंतप्रधानांनी प्रतिसाद देत “ही एक खूप मोठी उपलब्धी आहे. नव तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा आणि अर्थव्यवस्था स्वच्छ आणि पारदर्शक करण्याचा भारतीय नागरिकांचा संकल्प आहे, याचेच हे संकेत आहेत. विशेषतः कोरोना काळात, डिजिटल व्यवहार अतिशय उपयुक्त ठरले.”, अशी भावना ट्विवटरवरून व्यक्त केली.

समाज माध्यमांवर तिरंग्याचा डीपी ठेवा : पंतप्रधान

देशवासियांनी त्यांच्या सोशल मीडियावरील डीपी (डिस्प्ले पिक्चर) म्हणून तिरंगा झेंड्याचा फोटो ठेवावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. “आज, २ ऑगस्ट हा विशेष दिवस आहे. सध्या आपण सगळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, आपला देश हर घर तिरंगा, ही राष्ट्रध्वजाप्रती आदर दाखवण्याची मोहीम साजरी करत आहे.मी स्वतः ही माझ्या सगळ्या सोशल मीडिया पेजेसवरचा डीपी बदलला असून तुम्ही देखील, तिरंगा म्हणून डीपी ठेवावा, अशी माझी विनंती आहे”,असे ट्वीट पंतप्रधानांनी केले.

हे ही वाचा :

Back to top button