केरळ : अब्जाधीश आनंद महिंद्रांना ६३ वर्षीय ग्रंथपालाकडून मिळाली प्रेरणा; व्हिडीओ केला शेअर  | पुढारी

केरळ : अब्जाधीश आनंद महिंद्रांना ६३ वर्षीय ग्रंथपालाकडून मिळाली प्रेरणा; व्हिडीओ केला शेअर 

पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळमधील दुर्गम खेड्यांमध्ये पायपीट करून पुस्तके पोहोचवणाऱ्या ‘राधामणी’ या सध्या चर्चेत आहेत त्या प्रसिद्ध व्यावसायिक आनंद महिंद्रा यांच्या ट्विटमुळे. त्यांनी राधामणी यांचा ‘द बेटर इंडियाचा’ अडीच मिनिटांचा व्हिडीओ शेअर करत त्यांना विशेष सन्मान (standing ovation) दिला आहे. तसेच केरळ राज्य सर्वाधिक साक्षर असण्यामागील अनेक घटकांपैकी राधामणींचे कार्य एक भाग असून त्यांचे काम ‘शब्दांच्या पलीकडे प्रेरणादायी’ (Inspiring beyond words) असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. महिंद्रा हे नेहमी असे नाविन्यपूर्ण आणि प्रेरणादायी घटना, व्यक्ती यांना आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असतात.

आजच्या तंत्रज्ञानाच्या जगतामध्ये वाचनाची तळमळ जपणे फार महत्वाचे बनले असून यासाठी समर्पकपणे प्रयत्न करणाऱ्या ६३ वर्षीय राधामणी या प्रेरणादायी बनल्या आहेत. त्यांचा एक व्हिडीओ ‘द बेटर इंडिया’ने त्यांच्या सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी तो आपल्या ट्विटरला शेअर करत त्यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. या व्हिडीओनुसार राधामणी ‘वायनाड’ या खेड्याच्या आसपास असणाऱ्या दुर्गम खेड्यापाड्यांमधील महिला, लहान मुले, वृद्ध यांना पुस्तके पोहच करतात. त्या दररोज अनेक किलोमीटरचा प्रवास पायीच करत असतात. गेल्या दहा वर्षापासून अविरत सुरु असणाऱ्या त्यांच्या या कार्यामुळे आज ‘प्रतिभा वाचनालय’ मोठ्या दिमाखात उभे राहिले आहे.

हे वाचलंत का?  

Back to top button