राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 : प्रवेश प्रमाणपत्र ‘एमपीएससी’च्या संकेतस्थळावर उपलब्ध

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 : प्रवेश प्रमाणपत्र ‘एमपीएससी’च्या संकेतस्थळावर उपलब्ध
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 ही २१ ऑगस्‍ट राेजी हाेणार आहे. यासाठी प्रवेश प्रमाणपत्रे महाराष्‍ट्र लाेकसवा आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवरील उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या यासंबधी माहीती आयोगाने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. त्याचबरोबर आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरही ट्विट केले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक २१ ऑगस्ट २०२२ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२२ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरील (https://www.mpsc.gov.in/) त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहेत. प्रवेश प्रमाणपत्र मिळण्यात कोणतीही अडचण आल्यास उमेदवारास आयोगाच्या contact secretary@mpsc.gov.in support online@mpsc.gov.in या ईमेल व अथवा १८००-२२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरून विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022

विविध पदांसाठी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022

राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर राज्य लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा २०२२, रविवार, दिनांक २१ ऑगस्ट २०२२ रोजी होणार आहे. जाहिरातील गट 'अ' ५९,  गट 'ब'  १४ पदांसाठी आणि इतर ८८ पदांसाठी ही भरती होणार आहे.

जे विद्यार्थी पूर्व परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांची मुख्य परीक्षा तारीख २१, २२, २३ जानेवारी २०२३, रोजी किंवा त्यानंतर होण्याची शक्यता आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी पदे, नगरपालिकांमधील मुख्याधिकारी पदे, राज्य उत्पादन शुल्क विभागातील सहाय्यक आयुक्त आदी पदे  या भरती परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news