PSI : शेतकऱ्याची पोरं झाली फौजदार; आई-बाबांचे स्वप्न केले पूर्ण | पुढारी

PSI : शेतकऱ्याची पोरं झाली फौजदार; आई-बाबांचे स्वप्न केले पूर्ण

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगाव या छोट्या गावातील कु. सारिका नारायण मारकड (संध्या) या शेतकऱ्याच्या मुलीची  लोकसेवा आयोगाच्या घेण्यात आलेल्या परिक्षेत पोलीस उपनिरीक्षकपदी निवड (PSI) झाली. तिच्या या यशाचे कौतुक होत आहे.

सोलापुर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगाव या छोट्या गावातील कु. सारिका नारायण मारकड (संध्या) या शेतकऱ्याच्या मुलीने आपल्या कष्टाच्या जोरावर फौजदार(PSI) पदापर्यंत मजल मारली. कुगाव बाहेरील शेतवस्तीत सारिकाचे कुटूंब वास्तव्यास आहे.  जिल्हा परिषदेच्या शाळेत तिने आपले शालेय शिक्षण पुर्ण केले. तिने माध्यमिक शिक्षण चिखलठाण विद्यालयात, तर १२ वी पर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतुन पुर्ण केले. सहा महीने बी. कॉम केले पण डी.एड ला मिळ्याल्याने तिने बी. कॉम केवळ सहा महिने केले आणि मुक्ताई सुतार अध्यापक विद्यालय कोथरुडमधुन तिने डी. एड पुर्ण केले.

तिला प्रशासकीय क्षेत्रात येण्याची प्रेरणा तिच्या मावशीकडुन मिळाली. नोव्हेंबर २०१४ ला तिने स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासासाठी कोल्हापूर गाठले आणि सुरु झाला एक नवा प्रवास. त्याचवेळी तिने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथून बी. ए. करण्यास सुरूवात केली आणि स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करत करत तिने राज्यशास्त्र विषयातुन पदवी घेतली. अभ्यास करत होती पण थोड्या मार्कांनी अपयश येत होते. २०१८ च्या परिक्षेत आपण पास होवू असा आत्मविश्वास होता. पण यशाने हुलकावणी दिली. काही दिवस डिप्रेशनमध्ये गेली. पुन्हा सहा महिन्यांनी नव्या उमेदीने अभ्यासाला सुरुवात केली. ती पुण्याला अभ्यासाला गेली. वडिलांचा सुरुवातीला विरोध होत होता. पण जसजशी पुर्व, मुख्य परिक्षा पास होवू लागली तेव्हा वडिलांनीही तिला साथ दिली.

आतापर्यंत सारिका तिच्या घरात दहावी शिकलेली पहिली मुलगी आहे. आई बाबा शेती करतात जेव्हा जेव्हा ती घरी जायची तेव्हा ती शेतात काम करायची. याचा तिला फायदा पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारिरीक चाचणीवेळी झाला. तिला १०० पैकी १०० गुण शारीरिक चाचणीत मिळाले. कोरोना काळात ताणतणावाचं वातावरण होत. वय वाढतं होतं.  बऱ्याच मुलींची लग्न होत होती. पण आई बाबांनी तसे न करता तिला धीर दिला. अभ्यासास प्रोत्साहन दिले.  २०१९ ला परीक्षा दिलेली पण कोरोनामुळे सर्व लांबणीवर पडत होतं २०१९ चा हा निकाल २०२२ मध्ये लागला. सारिकाने कष्टाच्या जोरावर मिळवलेल्या यशाचे विशेष कौतुक सर्वत्र होत आहे. तिची ही जिद्द आणि कष्ट पाहुन तिच्या गावातील सरपंचांनी आणि ज्येष्ठ नागिराकांनी  निर्णय घेतला आहे की, गावात अभ्यासिका सुरु करण्याची जेणेकरुन मुला-मुलींना प्रोत्साहन मिळेल. आज सारिका तिच्या गावात आदर्श ठरली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button