साऊथ हिरो प्रभासने 'बाहुबली-२' मध्ये प्रचंड यश मिळवलं. संपूर्ण देशातचं नव्हे तर वर्ल्ड वाईड प्रभासचे (Prabhas) चाहते आहेत. अद्यापही प्रभासचं स्टारडम कायम आहे. बाहुबलीमधील देवसेना अर्थातचं अनुष्का शेट्टीसोबत प्रभासच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. वयाच्या ४२ व्या वर्षांपर्यंत प्रभासने (Prabhas) लग्नासाठी तब्बल ६ हजार मुलींची स्थळ नाकारली आहेत. इतकचं नाही तर असंही म्हटलं जातं की, अनुष्काचं होणार असलेलं लग्नदेखील त्यानं थांबवलय. पण का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल!आज प्रभासचा वाढदिवस. जाणून घेऊ या सुपरस्टार प्रभासविषयी.
प्रभासचा जन्म २३ ऑक्टोबर १९७९ रोजी चेन्नई झाला. प्रभासचं पूर्ण नाव प्रभास राजू उप्पलापति आहे. प्रभासने 'बाहुबली'साठी खूप मेहनत घेतली होती. प्रभासला वाटायचं की, त्याची को-स्टार अनुष्का शेट्टीनेदेखील पूर्णपणे शूटिंगवर फोकस करावे. कारण तो या चित्रपटाविषयी खूप गंभीर होता. इतकचं नाही तर त्याने चित्रपटासाठी आपल्या लग्नाचा विषय टाळला होता. पण, त्याचबरोबर, अनुष्काचं लग्नदेखील थांबवलं होतं.
मे, २०१७ मध्ये एका वेब पोर्टलमधील माहितीनुसार, अनुष्काचं लग्न २०१५ मध्ये ठरलं होतं. पण, प्रभासच्या सांगण्यावरून अनुष्काला हे लग्न थांबवावं लागलं होतं. खरंतरं प्रभासची इच्छा होती की, अनुष्काने केवळ 'बाहुबली'च्या शूटिंगवर लक्ष द्यावं. प्रभासने चित्रपट साहोसाठीदेखील अनुष्का शेट्टीच्या नावाची शिफारस केली होती. अधिक वजन वाढल्यामुळे निर्मात्यांनी अनुष्काच्या जागी श्रद्धा कपूरला कास्ट केलं होतं.
जेव्हा प्रभास 'बाहुबली'चे शूटिंग करत होता. त्यावेळी त्याला तब्बल ६ हजार मुलींचे मॅरेज प्रपोजल आले होते. प्रभासने पूर्ण लक्ष चित्रपटाकडे दिले. त्यामुळे सर्व लग्नाची स्थळं त्यांनी नाकारली. दरम्यान, मीडियामध्ये नेहमी प्रभास-अनुष्काच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.
प्रभासने २००२ मध्ये 'ईश्वर' या चित्रपटातून डेब्यू केलं होतं २००३ मध्ये तो 'राघवेन्द्र' या चित्रपटात दिसला. २००४ मध्ये चित्रपट 'वर्धन' आणि २००५ मध्ये त्याने पहिल्यांदा दिग्दर्शक एस एस राजामौलीचा चित्रपट 'बाहुबली'मध्ये भूमिका साकारली. हा चित्रपट ५० हून अधिक चित्रपटगृहांमध्ये १०० दिवसांपासून अधिक कालावधी चालला. प्रभासने 'पौरनामी', 'योगी' आणि 'मुन्ना'में काम केले.
१२ वर्षांपूर्वी २००९ मधील तेलुगु चित्रपट 'बिल्ला'मध्ये प्रभास-अनुष्का एकत्र होते. नंतर २०१३ 'मिर्ची' चित्रपटातदेखील दोघे एकत्र दिसले होते.
प्रभासचे सुरवातीचे शिक्षण भीमावरमच्या डीएनआर स्कूलमध्ये झाले. पुढे हैदराबादमधील श्रीचैतन्य कॉलेजमधून त्याने बी टेकची पदवी घेतली.
प्रभासचे वडील निर्माते सूर्यनारायण राजू आणि आईचे नाव शिवकुमारी आहे. सूर्यनारायण राजू तेलुगु चित्रपटांचे प्रसिध्द निर्माते आहेत. त्यांनी कृष्णावेनी, अमर दीपम, मधुरा स्वप्नम, त्रिशूलम, धर्म अधिकारी आणि बिल्ला यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केलीय. आई शिव कुमारी गृहिणी आहे.
प्रभासच्या मोठ्या भावाचे नाव प्रबोध असून तो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तो सध्या गोव्यात काम करतो.
'बाहुबली'च्या यशानंतर प्रभासने अनेक शू ब्रँड आणि डियो कंपन्यांसोबत करार केला. त्याची ब्रँड एंडोर्समेंट फी २ कोटी रुपये आहेत. प्रभासने महिन्द्रा अँड महिन्द्रा कंपनीशी डील केली आहे.
प्रभास दाक्षिणात्य सेलेब्समध्ये सर्वांत अधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रभासने 'बाहुबली' चित्रपटासाठी २५ कोटी रुपये मानधन घेतले होते. तर त्याचा आगामी चित्रपट 'साहो'साठी प्रभासला ३० कोटी रुपये मानधन मिळाले आहे.
एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सन २०१८ मध्ये प्रभासची एकूण संपत्ती १६० कोटी रुपये आहे. मानधनाशिवाय तो ब्रँड एंडोर्समेंटसाठी दोन कोटी रुपये मानधन घेतो.
प्रभासचा हैदराबादमध्ये एक आलीशान बंगला आहे. हा बंगला त्याने २०१४ मध्ये विकत घेतला होता. प्रभास देशात सर्वांत अधिक टॅक्स देणारा अभिनेता आहे. सन २०१६ मध्ये प्रभासने जवळपास ७ कोटी रुपये टॅक्स भरला होता.
सिंपल दिसणारा प्रभास कारवेडा आहे. त्याच्याकडे अनेक लक्झरी कारचे कलेक्शन आहे. ३.८९ कोटी रुपयांच्या किमतीची Range Rover, सर्वात महागडी गाडी Rolls-Royce Phantom आहे. या कारची किंमत जवळपास ८ कोटी रुपये आहे. प्रभासकडे ४८ लाखांची BMW X3, दोन कोटीं रुपयांची Jaguar XJ आणि ३० लाख रु. किंमतीची Skoda Superb देखील आहे.
प्रभासकडे गाड्यांच्या कलेक्शनमध्ये पाच लक्झरी गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांच्या किमती ३० लाख ते ८ कोटीपर्यंत आहेत. प्रभासकडे सर्वांत कमी किमतीची गाडी Skoda Superb आहे.