मुंबई; पुढारी ऑनलाईन : बिग बॉस मराठी सिझन तिसरा २५ व्या दिवशी सोनाली हिचा पुन्हा एकदा राग अनावर झाला आहे. बिग बॉस घरात विशालच्या कुठल्या निर्णयामुळे आणि कोणत्या कृतीमुळे सोनालीला इतकं वाईट वाटलं आहे? यांची उत्सुकता चाहत्यांची शिगेला पोहेचली आहे.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांमध्ये रूसवे आणि फुगवे होतच असतात. आपली जवळची व्यक्ति थोडं जरी वेगळं वागली, त्यांचा निर्णय आपल्या निर्णयापेक्षा वेगळा असला किंवा आपल्याला त्यांनी साथ दिली नाही तर लगेच सदस्यांना वाईट वाटतं. असंच काहीसं आजच्या भागात सोनाली आणि विशालमध्ये घडणार आहे. घरामध्ये विशाल आणि सोनालीची भांडण, मस्करी सुरूच असते. पण, आजची गोष्ट सोनालीच्या मनाला खूपच जास्त लागली आहे असे तिच्या बोलण्यावरून दिसून येत आहे.
सोनाली विशालला म्हणाली की, 'जर मी तुझ्यासोबत टाईम इनव्हेस्ट करते तर मला तुझ्याकडून रिटर्नची अपेक्षा आहे.' विशाल म्हणाला, 'मी नाही करत का टाईम इनव्हेस्ट'. सोनाली त्यावर म्हणाली, 'त्यांच्यातल्या गृपमधील सदस्यांनी कोणाचं दुसर्याच नावं घेतलं का? तू का नाही माझं नावं घेतलंसं.' यावर विशालचं म्हणाला की, 'मला जे वाटलं ते मी केलं.'
यावर पुन्हा सोनाली म्हणाली, उत्कर्ष म्हणाला होता की, 'सोनालीचा आवाज मोठा आहे. विशालनी हाच मुद्दा उचलून धरला आणि त्याचं मत आणि माझं मतं क्लियर नको करूस.'
यावर सोनाली म्हणाली, 'पहिल्या आठवड्यात माझा आवाज मोठा आहे म्हणून मी बोलले गेले असेल. तेव्हापासून तुला माहिती आहे, बाकीच्यांना नसेल माहिती एखादवेळेस. तू फालतू रिझन देतोस. यावर विशाल म्हणाला, फालतू नाहीये रिझन, तू माझ्या रिझनला फालतू म्हणू शकतं नाहीस.'
यानंतर सोनाली म्हणाली, 'फालतूचं आहे रिझन. तुला ना माणसांची किंमत नाहीये. खूप कमी किंमत आहे. तुझे statement त्या व्यक्तींपेक्षा मोठे असतात. तुझं म्हणण त्या व्यक्तींपेक्षा मोठे असतं. तुझी सिच्युएशन त्या व्यक्तिवर काय बेतलेलं आहे त्यापेक्षा मोठी असते. आणि प्रत्येकवेळेला असंच घडलेलं आहे' असे म्हणत हा वाद विकोपाला गेला आहे.
आता नक्की या दोघांमधील वाद कधी मिटेल ? विशाल त्याचं म्हणण सोनालीला पटवून देऊ शकेल ? नक्की विशालने काय रिझन दिले आहे ? कशाचं सोनालीला इतकं वाईट वाटलं आहे ? जाणून घेण्यासाठी बघा बिग बॉस मराठी सिझन तिसराचा आजचा भाग रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
हेही वाचलंत का?