Dr D Y Patil : सकारात्मकता हाच यशाचा मूलमंत्र : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील | पुढारी

Dr D Y Patil : सकारात्मकता हाच यशाचा मूलमंत्र : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

आनंदी आणि उत्साही आयुष्य जगण्यासाठी अहम्पणा, मत्सर आणि द्वेष यांचा त्याग करणे गरजेचे आहे. सतत सकारात्मक द़ृष्टिकोन ठेवून चिकाटीने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते, असा मूलमंत्र पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी वाढदिवसानिमित्त शुक्रवारी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिला. (Dr D Y Patil)

(Dr D Y Patil) डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा आणि बिहारचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी शुक्रवारी वयाच्या 87 व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त कसबा बावडा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात त्यांचा अभीष्टचिंतन सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खा. संजय मंडलिक, आ. चंद्रकांत जाधव यांच्यासह सर्व विभागप्रमुख आणि शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

दरम्यान, डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निवासस्थानी शाहू महाराज, दै.‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, दै.‘पुढारी’चे समूह संपादक आणि चेअरमन डॉ. योगेश जाधव यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. डॉ. डी. वाय. पाटील यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे औक्षण करून निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देत आशीर्वाद घेतले.

यावेळी त्यांच्या पत्नी शांतादेवी पाटील, डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, पृथ्वीराज पाटील, राजश्री काकडे, मेघराज काकडे, करण काकडे, पूजा ऋतुराज पाटील, डॉ. चैत्राली काकडे आदी उपस्थित होते.

कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, पत्रकारिता आणि शैक्षणिक क्षेत्रांतील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून आणि फोनद्वारे डॉ. डी. वाय. पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Back to top button