पुढारी ऑनलाईन :
चित्रपट करिअरशिवाय 'ही' अभिनेत्री नेहमीचं आपल्या आयुष्यातील मोठ्या निर्णयांमुळे चर्चेत राहिलीय. करिअरच्या सुरुवातीला अरबाज खानशी तिचं सूत जुळलं. पुढे दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. खान कुटुंबीयांची सून नंतर अनेक प्रश्नांच्या गर्तेत अडकली. तिने अरबाजशी घटस्फोट घेतला. पण, अर्जुन कपूरचं नाव तिच्याशी जोडलं गेलं. त्यांचं रात्री उशीरा डिनरला जाणं, बंगल्यावर भेट घेणं, फिरायला जाणं आणि बरंच काही…. सुरू झालं. एका मुलाची आई असूनही आपल्या वयापेक्षा कितीतरी लहान असणाऱ्या अर्जुनशी तिचं गुप्तगू सुरू झालं. हे वेळोवेळी सोशल मीडियावरील फोटोंवरून सिध्द झालंय. एक घटस्फोट घेतल्यानंतर आयुष्यात काय फरक पडतोय. दुसरा हमसफर जर जवळ असेल तर भूतकाळाला काहीचं महत्त्व उरत नाही. या हमसफरसाठी तिनं चक्क दबंग सलमान खानशीही पंगा घेतला. ती बोल्ड अभिनेत्री आहे- मलायका अरोरा. (Malaika)
मलायका अरोरा (Malaika) हिचा आज ४८ वा वाढदिवस. सुरुवातीला वीजे म्हणून काम करणारी मलायका टॉपची मॉडेल कशी झाली? प्रेम, घटस्फोट आणि अफेअर अशा विविध पातळींवर आयुष्यात तिने मोठे निर्णय घेतले. तिच्याबद्दल जाणून घेऊया या गोष्टी.
'छइयां-छइयां गर्ल' मलायकाचा जन्म २३ ऑक्टोबर रोजी झाला. वीजे, मॉडल, टीव्ही पर्सनॅलिटी आणि अभिनेत्रा म्हणून ती प्रत्येक भूमिकेत परफेक्ट बसते. वयाच्या ४८ व्या वर्षीदेखील तिने इतर अभिनेत्रींच्या सौंदर्य आणि फिटनेस कायम ठेवला आहे.
मलायका ११ वर्षांची होती तेव्हा तिचे आई-वडील वेगळे झाले. तिची आई आपल्या दोन मुलींना मलायका आणि अमृताला घेऊन चेंबूर शिफ्ट झाली.
तिने आपल्या करिअरची सुरुवात वीजे म्हणून केली. पुढे ती मॉडलिंग विश्वात उतरली. अनेक मोठ्या कंपन्यांसाठी तिने जाहिराती केल्या. तिला गुड नाल इश्क मीठा गाण्यातून तिला ओळख मिळाली. एक मुलाखतीत तिनं सांगितलं होतं की, स्ट्रगल करताना सावळ्या रंगामुळे तिला खूप टीका सहन करावी लागली होती. इंडस्ट्रीमध्ये गोऱ्या रंगाला प्राधान्य दिलं जात होतं. त्यामुळे स्वत:ची ओळख निर्माण करायला खूप अडचणी आल्या.
१९९८ मध्ये रिलीज झालेला चित्रपट 'दिल' मध्ये तिने 'छइयां छइयां' गाण्यावर डान्स केला. शाहरुख खान आणि तिचेयावर चित्रीत करण्यात आलेले हे गाणे जबरदस्त हिट झाले.
तिच्या आणखी एका आयटम नंबरने सर्व रेकॉर्ड तोडले. ते गाणे आहे-'दबंग'मधील 'मुन्नी बदनाम'. तिने अनेक चित्रपटांमध्ये कॅमियो रोल केला. यामध्ये 'बिच्छू', 'मां तुझे सलाम', 'कांटे', 'काल', 'हे बेबी', 'ओम शांती ओम', 'हाउसफुल' आणि 'हॅप्पी न्यू ईअर'चा समावेश आहे.
१९९८ मध्ये तिने अभिनेता-निर्माता अरबाज खानशी लग्न केलं. दोघांची भेट एका जाहिरातीच्या शूटिंगवेळी झाली होती. २०१७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना एक मुलगा अरहान खान आहे. तो मलायका जवळ असतो.
मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करतेय. खूप वर्ष त्यांचं नातं सार्वजनिक झालं नव्हतं. तिने २०१९ मध्ये अर्जुनच्या बर्थडेला त्यांचं रिलेशन ऑफिशियल केलं होतं.
खान कुटुंबीयाची सून असतानादेखील मलायका आणि सलमानच्या मधील नाते ठीक नव्हतेय असं म्हटलं जात होतं की, सलमानला मलायकाचे लाईफस्टाईल आवडायचे नाही. मलायकाच्या घरी अर्जुनचं येणं-जाणं. त्यासोबत फोनवर बोलत राहणं हे देखील सलमानला खटकायचं, अशी चर्चा होती.
अर्जुन हा आधी सलमानची बहिन अर्पिताचा बॉयफ्रेंड होता, असं म्हटलं जातं. अनेक पब्लिक इवेंट्समध्ये मलायका -सलमान एकमेकांना नजरअंदाज करताना पाहण्यात आलंय. इंडस्ट्रीमध्ये सलमानशी पंगा घेताना लोक घाबरतात. पण, मलायकाने सर्व नियम मोडित काढत आपलं राज्य सुरूचं ठेवलं.
वयाच्या ४८ व्या वर्षीही मलायकाने सर्वांची बोलती बंद केलीय. तिच्या फिटनेस पुढे भल्याभल्या अभिनेत्री मागे पडल्या आहेत. ती फिटनेस फ्रीक आहे. अनेक यंग अभिनेत्रींना ती मात देताना दिसतेय. दरम्यान, कोरोनाची लागण झाल्यानंतर तिचं वजन वाढलं होतं. पण, खूप मेहनत करून तिने वजन कंट्रोल केलं. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती जिमला जाते आणि योगादेखील करते. जिंदगी मिलेगी न दोबारा हे केवळ मलायकाकडूनचं शिकायला हवं! नाही का?
हेदेखील वाचा-