रश्मिका आहे कोटींची मालकीण, जाणून घ्या, ती एका महिन्यात किती कोटी कमावते?

rashmika mandanna
rashmika mandanna

पुढारी ऑनलाईन डेस्क

साऊथची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि साऊथ सुपरस्टार विजय थलापती यांनी थलापती ९६ नावाच्या आगामी चित्रपटाचे लॉन्चिंग केले. याचे काही फोटोजदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याचेही चाहत्‍यांना भूरळ घातली आहे.  इतकंच नाही तर ही अभिनेत्री कमाईतही कुणापेक्षा कमी नाही. तुम्हाला माहितीये का, ती चित्रपटांसाठीही मोठी रक्कम घेते.

नॅशनल क्रशमधील लोकप्रिय रश्मिकाचे फॅन फॉलोइंग केवळ दक्षिणेतच नाही तर उत्तरेतही आहे. रश्मिकाने तिच्या करिअरमध्ये अनेक उत्तम आणि हिट चित्रपट दिले आहेत. तिला अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर्स मिळतात आणि त्यामुळेच ती चांगली कमाई करते.

तुम्हाला माहिती आहे का, रश्मिकाची एकूण संपत्ती किती आहे? ही अभिनेत्री महिना आणि वर्षभरात किती कमावते?

एका अहवालानुसार, रश्मिकाची संपत्ती ४५ कोटींहून अधिक आहे. तिचा मासिक पगार ४० लाखांपेक्षा जास्त आणि वर्षभरासाठी ५ कोटींहून अधिक आहे. रश्मिका या चित्रपटासाठी ४ कोटी रुपये घेते. रश्मिका अभिनय, परफॉर्मन्स, मॉडेलिंग आणि जाहिरातींमधून काम करते.

रश्मिकाचे कर्नाटकात घर आहे, ज्यात ती आपल्या कुटुंबासह राहते. हे घर अतिशय आलिशान आहे. याशिवाय रश्मिकाने मुंबईत एक घरही खरेदी केले आहे, मात्र त्याच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती नाही.

गाड्या

रश्मिकाकडे मर्सिडीज सी क्लास, ऑडी Q3 आणि रेंज रोव्हर आहे.

रश्मिकाने आपल्या करिअरची सुरुवात क्रिक पार्टी या चित्रपटातून केली होती. या चित्रपटाद्वारे रश्मिकाने कन्नड इंडस्ट्रीत पदार्पण केले. यानंतर रश्मिकाने अनेक हिट कन्नड चित्रपटांमध्ये काम केले. यानंतर रश्मिकाने चलो या चित्रपटातून तेलुगू इंडस्ट्रीत पदार्पण केले. यानंतर तिने देवदास, डिअर कॉम्रेड, सरिलेरू नीकेव्वरू, भीष्म, पोगारू, सुलतान, पुष्पा द राइज सारखे हिट चित्रपट दिले आहेत.

रश्मिकाचे आगामी चित्रपट

रश्मिकाचे अनेक चित्रपट रिलीजसाठी तयार आहेत, ज्यामध्ये २ हिंदी चित्रपट आहेत. वास्तविक रश्मिका मिशन मजनू या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात रश्मिकासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. यानंतर रश्मिका गुड बाय या चित्रपटात दिसणार असून यामध्ये ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे. त्यानंतर पुष्पा २ या चित्रपटाच्या दुसऱ्या भागातही रश्मिका दिसणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news