नाशिक : महसूल कर्मचारी संपावर कायम | पुढारी

नाशिक : महसूल कर्मचारी संपावर कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्य महसूल कर्मचारी संघटनेने पुकारलेला संप तिसर्‍या दिवशीही राज्यातील सर्व तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात बघावयास मिळाला. कर्मचार्‍यांनी विविध प्रकारचे उपोषण करून शासनाचा निषेध नोंदविला.

नाशिक जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने बुधवारी (दि.6) संपाच्या तिसर्‍या दिवशी महसूल कर्मचार्‍यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. महसूल कर्मचार्‍यांनी नेहमीच आपत्तीच्या काळात जनतेची सेवा केली आहे. कोरोना काळात महसूल कर्मचार्‍यांनी जिवाची पर्वा न करता जनतेची सेवा केली आहे. मात्र, आज संपाचा तिसरा दिवस होऊनही शासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. शासनाची ही कृती अजिबातच योग्य नाही. त्यामुळे महसूल कर्मचार्‍यांमध्ये शासनाविषयी तीव्र असंतोष निर्माण झाला असून, पुढील टप्प्यात आंदोलन अधिक तीव— करण्याचा निर्धार राज्यातील सर्व महसूल कर्मचार्‍यांनी केला आहे.

संपामुळे नागरिकांची कामे प्रलंबित राहत आहेत. शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्यास, तत्काळ ही कामे मार्गी लावली जातील. नागरिकांना होत असलेल्या दिरंगाईबद्दल महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना दिलगिरी व्यक्त करते.
– नरेंद्र जगताप, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना

हेही वाचा :

Back to top button