हैदराबाद : तब्बल वीस लोक जेवू शकतील इतक्या मोठ्या मांसाहारी थाळीला अभिनेता आणि सामाजिक कार्यकर्ता सोनू सूद (Sonu Sood) याचे नाव देण्यात आले आहे. हैदराबादच्या 'गिस्मत' या अरेबिक हॉटेलने ही थाळी बनवली असून ही खास मटण थाळी वीस लोकांना जेवण्यासाठी देण्यात येते. सोनू सूदने स्वतः सोशल मीडियात या थाळीचा फोटो शेअर करीत म्हटले आहे की, माझ्यासारख्या शाकाहारी माणसाचे नाव देशातील सर्वात मोठ्या मांसाहारी थाळीला दिले जाऊ शकते, याचा मी विचारही केला नव्हता!
कोरोना काळात अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) त्याच्या समाजकार्याने प्रसिद्धीझोतात आला. त्याने लाखो कामगारांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोचवले. त्याच्या कार्यासाठी लोकांनी त्याला 'देवदूत' म्हणून संबोधले. सोनू सूदची लोकप्रियता एवढी आहे की, आता देशातील सर्वात मोठ्या थाळीला त्याचे नाव देण्यात आले आहे. स्वतः सोनूने या थाळीसोबतचा फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. हॉटेलच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलने सोनू सूदसाठी लिहिले, 'सर… तुमचे हृदय सर्वात मोठे आहे.
या थाळीसाठी आम्ही तुमच्यापेक्षा वेगळ्या नावाचा विचारच कररू शकत नाही. हैदराबादला आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, तुम्ही येथे आलात याचा आम्हा सर्वांना खूप आनंद होत आहे. याबद्दल सोनूने (Sonu Sood) म्हटले आहे, 'भारतातील सर्वात मोठ्या थाळीला माझे नाव देण्यात आले आहे. मी एक शाकाहारी माणूस असून माझ्यासारख्या कमी आहार असलेल्या माणसाचे नाव 20 व्यक्ती खाऊ शकतील अशा थाळीला दिले जाऊ शकते, असा मी विचारच केला नव्हता!'
हेही वाचा :