Healthy Breakfast for Kids : लहान मुलांसाठी एनर्जी बूस्टिंग स्‍नॅक्‍स | पुढारी

Healthy Breakfast for Kids : लहान मुलांसाठी एनर्जी बूस्टिंग स्‍नॅक्‍स

पुढारी ऑनलाइन डेस्क : Healthy Breakfast for Kids : पालक पोषण, आरोग्‍यदायी फायदे अशा गोष्‍टींचा विचार करत असल्‍यामुळे मुलांना योग्‍य पोषण मिळणे आव्‍हानात्‍मक ठरू शकते. मुलांच्या विकसनशील अवस्थेत पालकांनी लक्ष केंद्रित करणे हे सर्वात महत्वाचे असले तरी, मुलांची खाण्‍याच्‍या बाबतीत टाळाटाळ आव्‍हानात्‍मक ठरू शकते. मुलांची वाढ लवकर होते, त्यांना दिवसभर उत्साही आणि हालचाल करत ठेवण्यासाठी त्यांच्या वाढत्या वर्षांमध्ये भरपूर पोषण आवश्यक असते. मुलांना खाल्लेल्या स्नॅक्समधून योग्‍य पौष्टिक मूल्य आणि ऊर्जा मिळते याची खात्री करण्यासाठी आपण त्यांच्या खाण्याच्या पद्धतींचे निरीक्षण केले पाहिजे, तसेच पर्यायी स्नॅकिंग पर्यायांकडे लक्ष दिले पाहिजे. अॅबॉटच्‍या न्‍यूट्रिशन व्‍यवसायाच्‍या मेडिकल अॅण्‍ड सायण्टिफिक अफेअर्सचे संचालक डॉ. गणेश काढे पालकांना काही सल्‍ले देत आहेत, ज्‍यामुळे त्यांना त्यांच्या मुलांसाठी योग्‍य स्नॅक्स निवडण्यास मदत होईल.

Healthy Breakfast for Kids :

• जेवणाची वेळ निश्चित करा – भूक स्नॅक्सने भागवली जाऊ शकते, पण पालकांनी त्यांच्या मुलांसाठी जेवणाची निश्चित वेळ निश्चित करणे महत्त्वाचे आहे. मुलांचे स्नॅक्स शक्यतो जेवणाच्या दरम्यान शेड्यूल केले पाहिजेत. जेवणाच्या आधी खूप जास्त खाल्ल्याने त्यांची भूक कमी होऊ शकते. खाण्यासाठी खूप वेळ प्रतीक्षा केल्याने जास्त खाणे होऊ शकते.

• प्रथिनांना प्राधान्य द्या – सुरुवातीच्या काळात मुलांमध्‍ये हाडे आणि स्नायू विकसित होतात. त्यामुळे त्यांच्या स्नॅक्समध्ये प्रथिनयुक्त अन्नाचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. चॉकलेटसारख्या उच्च साखरेच्या स्नॅक्सच्या तुलनेत प्रथिने जास्त काळ भूक शमवण्यास मदत करतात. उदाहरणार्थ, अंडी, चीज किंवा शेंगदाणे हे प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत, जे त्यांना दिवसभर आवश्यक असलेली ऊर्जा देतात.

• चव – मुले भाज्यांपेक्षा गोड पदार्थांचा अधिक आस्‍वाद घेऊ शकतात, ज्‍यामुळे ते आरोग्‍यदायी आहार पर्यायांना नकार देतात आणि निवडक गोष्टी खाणारे बनतात. सकारात्मक सामाजिक वातावरणात आणि लहानपणापासूनच मुलांना नवीन खाद्यपदार्थ वारंवार खाण्‍यास दिल्‍याने मुलांमध्‍ये ते खाद्यपदार्थ खाण्‍याची इच्‍छा वाढते.

• भूक – जेवणाच्या वेळेच्‍या आधी स्नॅक केल्याने मुलांची जेवणाची इच्छा कमी होऊ शकते. याव्यतिरिक्त, जेवणाची आणि स्नॅक्सची वेळ निर्धारित करणे आवश्‍यक असण्‍यासोबत त्‍यांचे इतर गोष्‍टींपासून (उदा. स्क्रिन) लक्ष विचलित करणे देखील महत्त्वाचे आहे, कारण यामुळे त्‍यांना शरीरामध्‍ये भूक लागलेल्‍या संकेतांची जाणीव होण्यापासून रोखू शकते. यामुळे ते मोठे झाल्यावर जास्‍त खाण्‍याची किंवा पुरेशा प्रमाणात न खाण्‍याची शक्‍यता वाढते. आजीवन शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्‍या मुलभूत तत्त्वांची सवय बालपणीच लावावी. आरोग्‍यदायी सवयी व दिनचर्या तयार केल्याने सर्वांगीण वाढ होण्यास आणि मुलांचे एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.
ही बाब लक्षात घेत मुलांसाठी पाच सर्वोत्तम, पण आरोग्‍यदायी स्‍नॅकिंग पर्याय खाली देण्‍यात आले आहेत.

Healthy Breakfast for Kids :

१. उकडलेली अंडी आणि चीज क्यूब्स
आठवड्याच्‍या सुरूवातीला उकडलेली अंडी सेवन करण्‍याचे वेळापत्रक तयार करत मुलांना योग्‍य स्‍नॅकिंग द्या. मोठ्या अंडींमध्‍ये ६ ग्रॅम प्रथिने असते आणि लहान मुलांना आवडणाऱ्या चीज क्‍यूब्‍ससह ते परिपूर्ण आहेत. ५ ते ७ ग्रॅम प्रथिने आणि फक्‍त ८० कॅलरी असलेले चीज क्‍यूब्‍स उत्तम स्‍नॅक पर्याय आहेत, जे ताज्‍या भाज्‍यांसह देखील उपयुक्‍त ठरू शकते.

२. डी.आय.वाय. स्‍नॅक मिक्‍स
तुम्‍ही स्‍वत: घरी आरोग्‍यदायी घटकांनी युक्‍त स्‍नॅक तयार करू शकत असताना रेडीमेड स्‍नॅक मिश्रणांवर का खर्च करावा? स्‍वादयुक्‍त लहान स्‍नॅकमध्‍ये खारट नसलेले बदाम, अक्रोड आणि गोड नसलेला सुका मेवा, तसेच गोड नसलेले खोबरे, मनुका, खजूर व बिया यांचा समावेश करा.

३. पोहे
पोहे तांदळापासून बनवले जातात, तुम्ही हे चिरलेला कांदा, मसाले, औषधी वनस्पती, लिंबाचा रस आणि शेंगदाणे घालून शिजवू शकता. ही रिफ्रेशिंग, लेमनी डिश आहे आणि मुलांना अधिक हवीहवीशी वाटण्‍यासाठी त्‍यामध्‍ये काही कुरकुरीत शेव, ताजे कापलेले कांदे किंवा किसलेले खोबरे घालून त्‍यांच्‍या भूकेचे शमन करता येऊ शकते. मुलांसाठी हे देखील एक उत्तम टिफिन स्‍नॅक आहे.

४. पॅनकेक्‍स
पॅनकेक्स हा तुमच्या मुलांसाठी बनवायला सोपा आणि मजेदार स्नॅक पर्याय असू शकतो. मिश्रणात थोडी चॉकलेट फ्लेवर्ड पीडियाशुअर पावडर टाकल्याने चव वाढेल आणि स्नॅकचे पौष्टिक मूल्य वाढेल. हा ३७ पौष्टिक घटकांनी युक्‍त परिपूर्ण व संतुलित पोषण उपाय आहे, रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि ९० दिवसात मुलांमध्‍ये सर्वांगीण वाढ दिसून येण्‍यास मदत करण्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या या उपायाची चाचणी केली गेली आहे.

५. ढोकला व इडली
मेदाचे कमी प्रमाण आणि उच्‍च प्रमाणात प्रथिने असल्‍यामुळे हे सायंकाळच्‍या वेळी सेवन करता येतील असे उत्तम स्‍नॅक्‍स आहेत. ढोकला वाफवून अणि त्‍यासोबत गोड चटणी खाणे टाळल्‍याने कॅलरीचे प्रमाण कमी होण्‍यामध्‍ये मदत होऊ शकते. ओट्ससह इडली तयार केल्याने या डिशमध्ये अतिरिक्त ऊर्जा आणि प्रथिनांची भर होईल. Healthy Breakfast for Kids

हे ही वाचा :

Pakistan Nuclear Bombs : पाकिस्तान अणुबॉम्ब विकायला काढणार? २१ दिवस पुरेल एवढाच पैसा

Spy Balloon : अमेरिकेतील हवाईत दिसला पुन्हा स्पाय बलून

Back to top button