काँग्रेसकडून G-23 चे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू

काँग्रेसकडून G-23 चे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीबाबत आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली. काँग्रेसने G-23 चे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी सोनिया गांधी आणि राहुल गांधी दोघेही सक्रिय झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू बैठकांच्या फे-याही वाढल्‍या आहेत. तसेच G-23 गटाच्या नेत्‍यांकडून काँग्रेस नेतृत्व, आणि काँग्रेसची कार्यशैली बदलण्यासाठीची मागणी केली जात आहे.

सुत्राच्या माहितीनुसार, G-23 च्या काही नेत्‍यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. यामध्ये आनंद शर्मा, मनीष तिवारी आणि विवेक तनखा आदी सोनिया गांधींना भेटण्यासाठी जनपथवर गेले होते.

तसेच, सोनिया गांधीनी त्यांच्या नेत्यांशी या प्रस्तावावर चर्चा ही केली. तसेच काँग्रेस हायकमांड हे 'बंडखोर नेत्यांशी समेट करण्याच्या मनस्थितीत असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसच्या ढासळत्या प्रतिमेबाबत गांधी घराने आता सर्तक झाले आहे. त्यामुळे हायकमांडच्या विरोधातील आवाज कमी व्हावेत, अशी गांधी परिवाराची इच्छा आहे.

सोनिया गांधीनी गुलाम नबी आझाद यांचे केले अभिनंदन

पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचे सोनिया गांधी यांनी अभिनंदन केले. सोमवारी पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला. यानंतर सायंकाळी उशिरा सोनिया गांधी यांनी आझाद यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले. तसेच कोरोनामुळे सामूहिक कार्यक्रमास सोनिया गांधी येत नाहीत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news