रावसाहेब दानवे : ‘काँग्रेस, राष्ट्रवादीला दलितांची मते लागतात, पण आंबेडकर चालत नाहीत’ | पुढारी

रावसाहेब दानवे : 'काँग्रेस, राष्ट्रवादीला दलितांची मते लागतात, पण आंबेडकर चालत नाहीत'

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसला दलितांची मत लागतात पंरतू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चालत नाहीत. मुस्लिमांचे मत लागतात, परंतु एमआयएम चालत नाही, ही त्यांची नीती आहे, अशी टीका मंगळवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. (Raosaheb Danve)

शिवसेनेकडून विदर्भ आणि मराठवाड्यात सुरू करण्यात आलेल्या शिवसंवाद मोहिमेवर बोलतांना दानवे यांनी शिवसेनेवर टीका केली. भाजपला आव्हान देण्याची क्षमता शिवसेनेत राहीली नाही. कमी होत जाणारा जनाधार सांभाळण्यासाठी, भाजपला सुरूंग लावण्यासाठी मोहिम सुरू केल्याचे शिवसेना नेते सांगत असले तरी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची हिंमत वाढवण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.

शिवसेनेचे हिंदुत्व फिक पडले आहे. वारंवार ते हिंदुत्वाचा उल्लेख करतात पंरतु, आता त्यांच्याकडे तसे काही राहिले नाही. मराठवाडा, विदर्भातसह मुंबईत देखील भाजप जोरदार मुसंडी मारेल असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला. भाजपचा क्रमांक एकचा शत्रू काँग्रेस आहे.

एमआयएम दुसऱ्या क्रमांकाचा तर कम्युनिस्ट पक्ष तिसऱ्या क्रमांकाचा शत्रू आहे. त्यामुळे एमआयएम भाजपची ‘बी’ काय तर ‘झेड’ टीम देखील असू शकत नाही. जनतेचा अंदाज घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने टाकलेली ही गुगली आहे.राष्ट्रवादी, कॉंग्रेस सोडा शिवसेनाच आतून एमआयएमशी हातमिळवणी करतेय का, अशा चर्चा सुरू असल्याचे दानवे म्हणाले. (Raosaheb Danve)

Back to top button