Sonalee Kulkarni : ‘पुरे झाला आता नथीचा नखरा…’

Sonalee Kulkarni : ‘पुरे झाला आता नथीचा नखरा…’
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णी (sonalee kulkarni) नेहमी सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असून ती आपले हटके फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सध्या सोनाली कुलकर्णी (sonalee kulkarni) नवनवे फोटो शेअर करत आहे.

सोनाली कुलकर्णी हिने नुकतेच आपल्या इंन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत खास करून, सोनालीच्या नथीच्या नखऱ्यासोबत रूबाब पाहायला मिळाला आहे.

या फोटोत ती सुंदर दिसत असून यावेळी ती फ्लोवर फिन्ट रंगाच्या डेनिममध्ये दिसत आहे. यासोबत तिने मोठी मोत्याची नख नाकात घातली आहे. हा लूक तिचा चाहत्याच्या पसंतीस उरतला आहे. फोटोसोबत सोनालीने 'पुरे झाला आता नथीचा नखरा…,आता पाहा माझ्या नथीचा 'रूबाब'' अशी कॅप्शन लिहिले आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी खूपच प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एकाने 'अप्रतिम', 'सुंदर'. तर दुसऱ्याने 'विचित्र' असी हटके कॉमेंन्टस् केल्या आहेत. या फोटोत सोनालिने डेनिमवर नथ परिधान केल्याने तिला विचित्र असे चाहत्यांनी म्हटले आहे. सोनाली लवकरच महाराष्ट्राची हास्य जत्राच्या रंगमंचावर येणार आहे.

याआधी सोनालीने लाल रंगाचा जंपसूटसोबत मोकळे केस सोडल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हा लुक चाहत्यांना खूपच आवडला होता. यावेळी सोनालीने वेगवेगळ्या पोज दिल्या होत्या.

काही दिवसांपूर्वी सोनाली कुलकर्णीच्या 'तमाशा लाईव्ह' या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले होते. या चित्रपटात सोनालीसोबत सचित पाटील यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केलं आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news