Sona Mohapatra : मीटूमध्ये अडकलेल्या साजिद खानला पाहून भडकली सोना महापात्रा

sona mohapatra
sona mohapatra
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सलमान खानचा प्रसिद्ध टीव्ही रिॲलिटी शो 'बिग बॉस' (Bigg Boss) आणि वादग्रस्त प्रकरणांचा जुना संबंध आहे. यावेळी शोच्या ग्रँड प्रिमियरच्या दिवसापासून वाद सुरू झाला. १ ऑक्टोबरला 'बिग बॉस १६' (Bigg Boss 16) शो सुरु झाला. या सीझनमध्ये बॉलीवूड चित्रपट निर्माता साजिद खान (Sajid Khan) चीदेखील एन्ट्री झाली आणि शोमध्ये येताच वाद सुरु झाला. मीटू मोहिमेदरम्यान, अनेक महिलांनी साजिद खानवर गंभीर आरोप केले होते. आता साजिद खानची बिग बॉसमध्ये झालेली एन्ट्री पाहून बॉलीवूड गायिका सोना महापात्रा (Sona Mohapatra) संतापली. तिने आपला राग टीव्ही चॅनल्सवर काढला. तिने टीव्ही चॅनेल्सना भ्रष्ट म्हटले. (Sona Mohapatra)

सोना महापात्राने बिग बॉसमध्ये साजिद खानच्या एन्ट्रीवर राग व्यक्त करत ट्विट केलं आहे. तिने लिहिलंय, "हा साजिद खान आहे, जो एक टीव्ही रिॲलिटी शोमध्ये आला आहे. एक अनु मलिक, जो मुलांचा म्युझिक रिॲलिटी शो जज करत आहे. कैलाश खेर टीव्हीवर सेलिब्रिटी जज आहे. या सर्वांवर मीटूदरम्यान अनेक महिलांनी आरोप केले होते. भारतीय टीव्ही चॅनेल्स, अधिकारी खरंच भ्रष्ट आणि दु:खी आहे."

सोना महापात्राने सांगितला टीआरपीचा खेळ

शिवाय सोना महापात्राने आणखी एक ट्विट केलं. तिने सांगितलं की, हे सर्व टीआरपीसाठी होतं.

आणखी एका ट्विटमध्ये तिने लिहिलं की, "पीआर, टीआरपीसाठी अनेक मीटूच्या दोषींना कास्ट करण्याशिवाय शून्य क्षमतेच्या टीव्ही मार्केटिंग टीमला एक सूचना आहे. छेडछाड करणाऱ्यांनो, बलात्काऱ्यांनो, पीडोफाईलों आणि इथेपर्यंत​ की पत्नीला मारणाऱ्यांसोबत एक शो लाईन अप करा. समाजाला एका नव्या स्तरावर घेऊन जाण्यासाठी आनंद घ्या?"

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news