वारजे : मुलींच्या दोन गटांत फ्री स्टाईल हाणामारी | पुढारी

वारजे : मुलींच्या दोन गटांत फ्री स्टाईल हाणामारी

वारजे; पुढारी वृत्तसेवा: कर्वेनगरमधील जत्रेत रविवारी (दि. 2) सायंकाळी तरुण मुलींच्या दोन गटांत फ्री स्टाईल हाणामारी झाली. या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कर्वेनगरमधील या जत्रेत नवरात्रोत्सवात असंख्य नागरिक, तरुण-तरुणी, लहान मुले येत असतात. रविवार सायंकाळी या जत्रेत नागरिकांची व महिलांची मोठी गर्दी झाली होती. या दरम्यान तरुणींच्या दोन गटांत कुठल्या तरी कारणावरून बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले.

त्यानंतर बघता बघता या तरुणींमध्ये फ्री स्टाइल हाणामारी सुरू झाली. यातील तरुणींनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच एकमेकांचे केस धरून ओढताण सुरू होती. वाद विकोपाला गेला हे लक्षात आल्यावर जमलेल्या नागरिकांसह त्यांच्या मैत्रिणींनी मध्यस्थी केली आणि एकमेकींना बाजूला नेत हा वाद मिटविला. काहींनी या तरुणींच्या भांडणांचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केला असून, तो व्हायरल झाला आहे. दरम्यान, या तरुणींमध्ये कोणत्या कारणावरून ही हाणामारी झाली, हे मात्र अद्याप समोर येऊ शकले नाही.

Back to top button