पुढारी ऑनलाईन डेस्क
पाकिस्तानी-अमेरिकन अभिनेत्री सोमी अली (Somy Ali) चा बॉलीवूडमध्ये एक छोटं करिअर होतं. सोमीने 'यार गद्दार', 'आंदोलन' आणि 'अंत' यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. तसं पाहिलं तर तिचं वैयक्तिक जीवन प्रोफेशनल जीवनापेक्षा जास्त चर्चेत राहिली होती.(Somy Ali)
सलमान खान आणि सोमी अलीचं रिलेशनशीपदेखील खूप चर्चेत राहिलं. आता सोमीने अनेक वर्षांनंतर सलमान खानशी लग्नाविषयीचा मोठा खुलासा केला आहे.
सलमान खान आणि सोमी अली हे ९० च्या दशकात एकत्र होते. त्यांचं नातं कुठेही लपलेलं नव्हतं. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने हे खुलासे केले आहेत. सोमीने सांगितलं की, सलमान खान तिचा क्रश होता. तिने सलमानशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
ती म्हणाली, 'आम्ही हिंदी चित्रपट पाहत होतो. मी 'मैंने प्यार किया' पाहिला आणि सलमान माझा क्रश बनला. त्यावेळी रात्री माझं एक स्वप्न होतं. आणि मी भारतात येण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मी १६ वर्षांची होते. तेव्हा माझ्यासाठी हा विचार करणेदेखील एक थट्टा होती की, मी मुंबईला जाऊन सलमानशी लग्न करू शकते. सोमी म्हणाली, ती एक सुटकेस शोधत होती. आणि तिने आपल्या आईला सांगितलं की, ती सलमानशी लग्न करण्यासाठी मुंबईला जात आहे.
अलीने त्या घटनेबद्दल सांगितलं, जे तिनं आजपर्यंत लपवून ठेवलं होतं. ती म्हणाली, तिने सलमानला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. ती म्हणाली, आम्ही नेपाळला जात होतो. मी त्याच्या शेजारी बसले होते. मी सलमानचा एक फोटो काढून त्याला दाखवला. मी सलमानला म्हणाले की, 'मी तुझ्याशी लग्न करायला इथे आले.
तेव्हा तो म्हणाला, माझी एक प्रेयसी आहे. मी म्हणाले, काही फरक पडत नाही. मी अल्पवयीन होते. ती म्हणाली, वयाच्या १७ व्या वर्षांनंतर तो रिलेशनशीपमध्ये बांधला गेला होता. ती म्हणाली, 'त्यान मला आधी म्हटले होते की, मी तुझ्यावर प्रेम करतो. आणि हीचं गोष्ट खूप विश्वास करणारी होती.